हणमंतराव पाटील यांना आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी वाहीली श्रद्धांजली.
हणमंतराव पाटील यांना आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी वाहीली श्रद्धांजली.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
हणमंतराव पाटील (बुवा)पेठ ता.वाळवा यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले त्यांनी वया च्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कराड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. आत्मशक्ती उद्योग समुहाचे ते संस्थापक होते. पेठ व परीसरातील शंभर हुन अधिक लोकांचे ते पालक होते.आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी शाखा कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहीली.
राजकीय व सहकार क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ व्यक्तीमत्व असुन त्यांच्या अचानक जाण्याने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत शेडगेवाडी शाखा कर्मचारी बाळकृष्ण काबंळे यांनी बुवानां श्रद्धांजली वाहिली .
ते पेठ गावच्या दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. ते हसतमुख होते आणि तितकेच परखड,प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने संपुर्ण पेठ व आत्मशक्ती उद्योग समुह क्षेत्राची हानी झाली आहे.

Comments
Post a Comment