कोरोनाला हरवायचंच पण हरवणार कोण?सरकार ?प्रशासन ?सरकारीकर्मचारी ?डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी...?????????

   


कोरोनाला हरवायचंच पण हरवणार कोण?सरकार ?प्रशासन ?सरकारीकर्मचारी ?डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी...?????????





उंडाळे -  प्रतिनिधी( प्रदीप पाटील). 

     कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती आहे.  चीनपासून सुरवात झाली आणि या कोरोनासुराने एक एक देश आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली संबंध जगातील देशांची आणि देशवासियांची व प्रशासनाची पळापळ चालू केली.

  सर्वजण बोलायला लागले आपल्याला जिंकायचंच आणि कोरोनाला हरवायचंच पण हरवणार कोण?सरकार ?प्रशासन ?सरकारीकर्मचारी ?डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी ?

पत्रकार ?यांनीचं लढायचं का या कोरोनाशी?

आणि आपण मात्र शासन आदेश धुडकावून इकडे तिकडे मोक्काट फिरायचं आणि आपल्याकडे नसलेला कोरोना संसर्ग आपल्या घरी पाहुणा म्हणून आणायचा व आपल्या घरातील तसेच शेजाऱ्यांशी त्याची ओळख करून त्याला आपलं घरोबा करून ठेवायचं आणि आपण मात्र वरील या पाहुण्याशी लढणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण पाहुणे म्हणून जायचं.

खरंच जनतेने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. चीनने काय उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याचा बारीक विचार करून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रशासनाला सहकार्य  मिळेल असे वागले पाहिजे. शासनाचे आदेश तंतोतंत पाळले पाहिजे ज्यामुळे ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल.

आज विचार केला तर काही महाभाग राजकीय विचारांवर भाष्य करून जनतेमध्ये राजकीय विचारांचे विष पेरून राजकीय विचारांचा उद्रेक करू पाहत आहे. म्हणजे आपली मानसिकता किती भुरसटलेली आहे हे आपण दाखवून देत आहोत.

रोज रोज तेच तेच सांगून आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घसे बसू लागलेत. पण त्यांचा आवाज काही महाभागांना अजूनही ऐकू येत नाही. ते खुलेआम आजारी असताना गर्दीत फिरतात तर काही विनाकारण गर्दी करतात शासन आदेश मोडले म्हणजे आपण काही वेगळे केले या अविर्भावात मिरवतात. पण त्यांनी हे समजून घेतले.पाहिजे शासन आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी देशहितासाठी झटत आहे. आपण फक्त आपल्या परिवारासाठी घरी बसा, गर्दीमध्ये जाऊन कोरोनाला पाहुणा म्हणून घरी घेऊन येऊ नका.

     रोजची परिस्थिती पहा. ती आत्ताच आपण आटोक्यात आणू शकतो त्यासाठी फक्त शासन आदेशानुसार घरी बसुन काम करा. शासनाला सहकार्य करा.

    आजची ही परिस्थिती आपल्या एका बेजबाबदार वागण्यामुळे उद्या किती भीषण रूप धारण करेल.काळजी घ्या,शासन आदेश पाळाआणि गर्दी टाळानाहीतर....त्यामध्ये होरपळेल....आपण स्वतःआपले कुटुंबआपले शेजारीआपले गावआपला तालुकाआपला जिल्हा

आपलं राज्य आणि आपला देश

म्हणून प्रत्येकाने स्वतः विचार करून वागा

हीच वेळ आहे आपण घरी बसून देशहितासाठी

आपल्या कुटुंबासाठी जगा

  शासन आदेशानुसार आपण फक्त गर्दी न करता घरी बसून या कोरोनासुराला ठार करू शकतो.

फक्त शासन आदेश पाळा घरीच रहा

विनाकारण गर्दी टाळा.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .