पत्रकारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील.
पत्रकारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही.
____पंचायत समिती सदस्य
नामदेव पाटील.
कराड - प्रतिनिधी (सारिका मंडले)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या साठी हॉस्पिटलमध्ये कोव्हीड सेंटर मध्ये कमीत कमी दोन बेड राखीव असावे असे निवेदन पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांना देण्यात आले. या वेळी बोलताना पाटील म्हणाले की सत्यजित पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत खोडशी, वनवासमाची, वारूंजी, मुंडे तसेच कराड शहर पोलीसांना देखील अॉक्सीजन मशीन दिली. तसेच येत्या काही दिवसांत जनता बॅंकेच्या शेजारी 30 बेड च्या कोयना कोव्हीड सेंटर चे काम सुरू होईल त्याचा फायदा सर्व सामान्यांना देखील होईल. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांना देखील कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदतीचा हात देवू अशाच प्रकारे आमच्या पत्रकार बांधवांना देखील कोव्हीड सेंटर आणि हॉस्पिटल मध्ये मध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही व कुठल्याही प्रकारे पत्रकारांसाठी बेड ची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Comments
Post a Comment