नवीन पूलाचे काम सुरू असताना पोकलॅन मशिन नदीपात्रात कोसळले.
नवीन पूलाचे काम सुरू असताना पोकलॅन मशिन नदीपात्रात कोसळले.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार )
सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे मांगले या नवीन पुलाच्या कामास सुरुवात केली आहे त्यामुळे जुना पुल पाडण्याचे काम सुरु असताना पोकलॅन मशिन वारणा नदी पात्रात कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
मांगले काखे नवीन पुलाच्या कामासाठी बारा कोटी रुपये मंजुर आहेत या पुलाच्या कामास सुरुवात झाली असुन दरम्यान नविन पुलाच्या पिलर उभारणीसाठी जुन्या पुलाचा काही भाग पोकलॅन मशिनने तोडण्यात येत होता. यावेळी अचानक पुलाचा स्लॅबचा गाळा पोकलॅन मशिन सह वारणा नदी पात्रात कोसळला. दरम्यान पोकलॅन ऑपरेटर या दुर्घटनेतुन सुखरूप पणे बाहेर पडला. दरम्यान कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Comments
Post a Comment