उंडाळे बसस्थानकावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचे विचित्र दर्शन .
उंडाळे बसस्थानकावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचे विपरीत दर्शन .
" विना मास्क नागरिकांच्यावर कारवाई व इतर नियमांना बगल "
' नागरीकांच्यात कमालीची असंतोषाची भावना , प्रशासनानं नागरिकांच्यात समन्वय साधून लोक जागृतीतून कोरोना प्रतिबंधक चळवळ उभारणे गरजेच.'
उंडाळे - प्रतिनिधी ( प्रदिप पाटील.)
उंडाळे परिसरात मध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव पाहता उंडाळे ग्रामपंचायत उंडाळे व पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असुन उंडाळे पोलिस स्टेशन हद्दीतील गावासह परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या,तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या,विनाकारण फिरून सोशल डिस्टंसिंग चा भंग करणाऱ्या नागरिकांवर उंडाळे पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.यामध्ये गेल्या दोन दिवसात जवळपास शेकडो नागरिकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई अजून काही दिवस सुरूच राहणार आहे. यामध्ये दुचाकीवरून विना मास्क फिरण्या-यांवर उंडाळे बसस्थानकावर योग्य कारवाई करण्यात पोलीस प्रशासन आघाडीवर दिसुन येत असुन यामुळे नागरिकांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी मार्केट,बाजारात, भाजीपाला, किराणा दुकान ,इतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना, मास्क वापर करावा अन्यथा पोलिसांच्या दंडात्मक कारवाई कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांसाठी सोशल डिस्टंसिंग व विना मास्क फिरण्या-यांवर करण्यात येणारी कारवाई स्वागतार्ह आहे, त्याचबरोबर प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक घटकासाठी नियम दिलेले आहेत त्याच्याकडं मात्र डोळेझाक केली जाते . कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून देखील ओळखीच्या व्यक्तीला सूट व सामान्य जनतेला कायद्याचा बडगा दाखवायचा. अशी कारवाई उंडाळे बसस्थानकावर बंदोबस्तात असणाऱ्या होम गार्डकडुन कारवाईचा अतिरेक करण्यात येत असल्याचे नागरिकांनमधुन बोलले जात आहे, या असमान कारवाई बद्दल नागरिकांमधून असंतोष दिसून येत आहे . आपल्या अधिकारांचे उल्लंघन करत सदरचे कर्मचाऱ्यांकडुन रस्त्यामधोमध्ये उभे राहुन , कारवाईस पात्र नसणाऱ्या वाहन धारकांना विनाकारण त्रास देण्यासह , संबंधित कर्मचारी स्वःताच्या ओळखीतील तरुणासह गप्पा गोष्टी मारण्यात मशगुल असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा येण्याचे कित्येकदा आढळुन येत असून ,रस्त्यामधे मोबाईलवर गप्पा मारत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने येथे तर "चहा पेक्षा किटली गरम" हि अवस्था पहावयास मिळत असुन सार्वजनिक ठिकाणी शासकीय नियमाचे उल्लंघन करण्या-यांवर योग्य ती कारवाई जरुर करण्यात यावी मात्र त्या कारणांचा "बाव" करत नाहक सर्वसामान्यांना वेठीस धरने कितपत योग्य आहे? कायद्याचा दुरूपयोग करत आपला स्वार्थ सादणा-या संबंधित लोकसेवकावर वरिष्ठामार्फत दुर्लक्ष होत आहे का ? दुर्लक्ष होत असेल तर का? आणि कशासाठी ? नसेल तर संबंधितावर कारवाई होणार का ? असे एक ना अनेक प्रश्न जागरुक नागरिकांनमधुन उपस्थित होत आहेत.


Comments
Post a Comment