जिल्हाबंदी अखेर संपली , ई पास रद्द ,शाहुवाडी शिराळा तालुक्याच्या बंद सिमा पुन्हा सुरु.

   

जिल्हाबंदी अखेर संपली , ई पास रद्द ,शाहुवाडी शिराळा तालुक्याच्या बंद सिमा पुन्हा सुरु. 

 "आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. २ सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी. "






शिराळा -  प्रतिनिधी  (आनंदा सुतार)

मार्च महिन्यापासून  सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. शाहुवाडी व शिराळा तालुक्याच्या बंद सिमा पुन्हा सुरु. करण्यात आल्या असुन चरण सोंडोली येथील दोन तालुक्याला जोडणारा वारणा नदीवरील पुलावरील मातीचा ढिगारा मशीनच्या सहाय्याने ग्रामस्थांनी बाजुला करुन गेले पाच महीने बंद असलेला पुल पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे.यामुळे शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम भागाला एक प्रकारे दिलासा मिळाला असुन नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.


 एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे  एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही.राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, 


मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय   हॉटेल उपहारगृहे आणि लॉज निवासगृहे यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली  जारी करण्यात येणार आहे.

 आंतरजिल्हा प्रवासी व माल वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट, संमती , स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .