उंडाळे विभागात अवैध गौण उत्खनन फार्मात. जिल्हा पातळीवर कायदेशीर , कारवाई ची मागणी

 उंडाळे विभागात अवैध गौण उत्खनन फार्मात.

" जिल्हा पातळीवरून कायदेशीर कारवाईची नागरीकांच्यातून मागणी". 


उंडाळे-  प्रतिनिधी ( प्रदिप पाटील)

  उंडाळे भागातील असणाऱ्या साळशिरंबे, तुळसण, विठ्ठलवाडी, टाळगाव ,तसेच ओंड या भागातील असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये गौण खनिजाचे उत्खननचे प्रमाण वाढलेले दिसून येत असुन या  सर्व ठिकाणी जेसीबी व पोकलेन यासारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून ठीक ठिकाणी मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढलेले आहे. डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. 

महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टी भरली असेल तर ती ही नाममात्र दिसुन येते मात्र, हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक झाली आहे. 


  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांनी डोंगर सपाट करण्याचा सपाटा लावला आहे. जेसीबी मशीनद्वारे मुरुम भरुन, पाच- सहा डंपर दिवस- रात्र खेपा करीत आहेत. भरधाव वेगाने जाणारे पाच ब्रासपेक्षा जास्त क्षमतेचे अवाढव्य डंपर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवित आहेत.

   गौण खनिज पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे परंतु उंडाळे भागातील असणाऱ्या तुळसण, विठ्ठलवाडी ,साळशिरंबे , टाळगाव व ओंड या गावांमध्ये भरपूर ठिकाणी मुरमाचे उत्खनन केलेले असून या ठिकाणी असणारे मुरूम उत्खननाच्या जागी प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन केल्याचे दिसून येत आहे शासनासाठी भरला जाणारा कर हा फक्त कागदावरती दाखवण्यापुरता आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे  कारण की सर्रास ठिकाणी केलेले उत्खनन हे प्रमाणापेक्षा जास्त केल्याचे दिसून येत आहे. भागातील असणारने" रावसाहेब," "आण्णासाहेब "मात्र  या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत ते "मुक्याचे सोंग "का घेत आहेत हा मोठा प्रश्न नागरीकांना पडला आहे. तसेच  विचार करण्याची बाब म्हणावी लागेल वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या  पाठीमागेच हा कारभार चालू असून वरिष्ठ अधिकारी  यांनी का आज पर्यँत लक्ष घातले नाही  असा प्रश्न नागरिक व सामान्य माणसाला पडत आहे राजरोज पणे शासनाचा कर बुडवून  मुरमाची दिवसा  ढवळ्या चोरीच होत आहे ते हि स्थानीक स्तरावरच्या अधिकारी वर्गाच्या हजेरी मध्ये ही वाहतूक होऊन पण हे गप्प  का? आहेत हेच समजत नुसन या वरती वरिष्ठ अधिकारी वर्गानी लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या चालु असणाऱ्या उत्खनन त्या त्या ठिकाणी सरासरी 100 ब्रास चा परवाना काढणे व तेवढाच कर शासनास भरून उत्खनन मात्र 500 ब्रास करणे  असा प्रकार सर्रास ठिकाणी चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणीं चा 400 ब्रास चा कर हा कोणाच्या खिशात जातोय हे पाहणे गरजेचे आहे. चालू असलेला बेकायदेशीर उत्खनन कोणाच्या 'वरदहस्ता'मुळे चालत आहे ह्या गोष्टीचा विचार करणे देखील गरजेचे आहे .  त्या ठिकाणी असणारे महसूल विभागाचे अधिकारी कारवाई बाबत का आणि कशासाठी"चूप्पी" सादत आहेत हा कुतुहलाचा विषय असुन गाढ झोपत असणाऱ्या प्रशासनास अवैध उत्खननाबाबत  कोणते  " अस्त्र" काढुन त्यावर काय इलाज करता येत , का नुसती कागदी कारवाई चे घोडे नाचवले जातील यांच्याकडे परिसरातील सुजाण नागरिक प्रतिक्षेत असुन  या अशाप्रकारचे अवैध उत्खनन राजरोसपणे चालू असुनही त्यांची थोडीशी सुध्दा कल्पना संबधित अधिकारी वर्गास नसेल..तर ते बालीशपणाचेचं म्हणावे लागेल संबधित ठिकाणी  झालेले उत्खनना  वरती नियंत्रण का?करता  येत नाही. या गोष्टीचा विचार सामान्य लोकांना पडला आहे. 

लाखो रुपयांचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरी सुरू असुन या भागातील  महसूल प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाले आहे ,ते "अर्थपूर्ण" दुर्लक्ष माफियाराज वाढण्यास कारणीभूत ठरुन समाजासाठी मारक ठरत असल्याचा ग्रामस्थांमधुन  आरोप होत आहे.

दिवसेंदिवस गौण उत्खनाच्या चोरीत वाढ होत असुन ह्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष देणे गरजेचे असुन अशाप्रकारे दुप्पट पद्धतीने उत्खनन करणे हे तिथल्या अधिकारी वर्गाच्या निदर्शनास का?  येत नाही का? तसेच हे अधिकारी जाणीवपूर्वक  दुर्लक्ष?  करत आहेत त्याच बरोबर या मध्ये आणि किती "हात" एकमेकांस साथ देताहेत हे ही सध्या जिल्हा पातळीवरुन पाहणे गरजेचे झाले आहे.  मुरूम उत्खनन झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून, जिल्हातरीय महसूल खात्यातर्फे संबंधित गौणखनिज माफिया व त्यांना पाठिशी घालणाऱ्यानां कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी. अशी ग्रामस्थांतुन मागणी जोर धरु लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .