मायक्रोफायनान्स व वाहनांचे कर्ज हप्ते डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावे..

 मायक्रोफायनान्स व वाहनांचे कर्ज हप्ते डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावे .
जनता क्रांती दल सातारा जिल्हा यांची मागणी .



कराड - प्रतिनिधी ( सारीका मंडले)

कोरोनासारख्या विषाणू संसर्गामुळे लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. लोकांच्या हाताला कामधंदा  नसल्यामुळे  आणि लॉकडाउन सारखी परिस्थिती  चालूच असल्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट आले आहे.तरी मायक्रो फायनान्स, ट्रॅव्हलर , फोरव्हिलर वाहन फायनान्स कंपनी चे कर्मचारी लोकांना हप्ते भरण्याचा तगादा लावला आहेत .

कराड तालुका येथील मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते  डिसेंबर महिन्या पर्यंत थांबवण्यात यावे यासाठी

आज जनता  क्रांती दल संघटना सातारा जिल्हा यांनी  प्रांतअधिकारी, तहसिलदार  कार्यालय कराड यांना  व जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा यांना  निवेदन  दिले.  

यावेळी मा. अनिल लोंढे (सातारा जिल्हा अध्यक्ष )जनता क्रांती दल संघटना  ,श्री. सागर लाखे ( कराड  शहर अध्यक्ष जनता क्रांती दल), श्री. विक्रम साठे (युवक अध्यक्ष कराड जनता क्रांती दल) तसेच मा. श्री. दादासाहेब जावळे(मलकापूर शहर अध्यक्ष जनता क्रांती दल संघटना  ) मा.श्री. सुरज घोलप.(बाबा)जनता क्रांती दल संघटना कराड तालुका कार्याध्यक्ष) 

व जनता क्रांती दल संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .