शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू.शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू.
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
शिराळा उप जिल्हा रुग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून दवाखान्यात अॅडमीट तीन वृद्ध कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन कमी आहे हे कारण सांगुन सांगलीत ऑक्सीजन बेड आहे जावा म्हणून हाकलून देण्यात आले. सांगली येथे अॅडमिट करून घेतले जाणार आहे का बेड मिळणार आहे का याची खात्री न करताच रूग्ण रात्री बारा वाजता नातेवाईकांना बोलावून पाठवण्यात आले. तीन वयोवृद्ध कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना व नातेवाईकांना १०८ रुग्णवाहीकेतुन एकत्रच पाठवले .कोरोना बाधित रूग्णांच्या गाडीत नातेवाईकांना बसवण्याचा अजब प्रकार घडला आहे. डॉक्टर पी पी कीट व नातेवाईक साध्या वेषात गाडीत होते. सांगली येथे रात्री बारा वाजता पाठवले सदर तीन वृद्ध रूग्णांना सांगलीत अॅडमिट न करता परत शिराळा येथे पाठवले चार दवाखाने फिरूनही त्यांना रात्री कोणीच घेतले नाही. रात्रभर फिरून परत त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.शिराळा उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन किती आहे रुग्णालयातील कर्मचारी यांना माहिती नाही.बेड उपलब्ध असुनही नाही म्हणून सांगितले जाते. उप जिल्हा रुग्णालयातील अॅडमिट रूग्णाचा तर रात्री डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. खाजगी रुग्णालयात रुग्णा हलवण्याची वेळ तालुक्यात आली असुन कोरोना रुग्णांच्या १०८ गाडीतून नातेवाईक नेण्याचा गंभीर प्रकार शिराळा उपजिल्हा रुग्णालयात होत आहे. रात्री रुग्ण नातेवाईकांना फोन करून ऑक्सीजन संपला असल्याचे सांगत आहेत.
खाजगी रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत का नाही याची कल्पना नाही असे असताना याची कल्पना दिवसा दिली असती तर ऑक्सीजन बेड सुविधा उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात रूग्ण घेवुन जाता आले असते .नातेवाईकांना खाजगी दवाखान्यात उपचार साठी पैसे नाहीत तरीही त्यांनी रुग्णांचा जीव वाचला पाहिजे या हेतूने रूग्ण खाजगी रुग्णालयात हलवले जात आहेत. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात २० ऑक्सीजन बेड सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत.मात्र कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे त्यांना ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन लावला जात नाही.तालुक्यात कोरोना लागण झाल्याने मृत्यू संख्या ३५ झाली आहे. तर रुग्ण संख्या ९९०झाली आहे.
मृत्यू दर ३.७२आहे. कोरोना उपचार होऊन ५८३रूग्ण बरे झाले आहे. शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात ४५ तर कोकरूड येथे १२रुग्ण उपचार घेत आहेत. २० बेडला ऑक्सीजन सुविधा करण्यात आली आहे. ३९२९ लोकांचे स्वँब घेण्यात आले आहेत. तर १८१९ लोकांच्या ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. शिराळा शहरात १६५ कोरोना रूग्ण असून ७ मयत झाले तर दोन भीती पोटी मरण पावले आहेत.

Comments
Post a Comment