कोडोली येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येकडून युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

कोडोली येथे रोशनबी शमनजी  कृषी महाविद्यालयाच्या कृषी  कन्येकडून  युरिया प्रक्रियेचे  प्रात्यक्षिक.



कार्वे प्रतिनिधी :- 

                    कोडोली ता. कराड येथे रोशनबी कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या सोनाली कृष्णा जगताप हिने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृषिकन्या सोनाली जगताप हिने चाऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने युरियाचा वापर करून चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया करताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करावा व किती प्रमाणात करावा यांच्या माहितीसह संपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच गुळ, खनिजे यांचे प्रमाण किती असावे याबाबत ची उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना या कृषि कन्येने दिली.

         यावेळी कृषिकन्या चे वडील कृष्णा विष्णू जगताप, बाळासो कदम,  दत्तात्रय जगताप, भरत जगताप, डॉक्टर शशिकांत जगताप तसेच कोडोली गावातील शेतकरी उपस्थित होते. हे प्रत्यक्ष घेण्यासाठी कृषिकन्या सोनाली कृष्णा जगताप हिला तिच्या वडिलांचे कृष्णा विष्णू जगताप तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. बिरादार समन्वय प्रा. एम .डी. माळी कार्यक्रम अधिकारी बी .बी. कडपे यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक covid-19 चे सर्व नियम पाळून करण्यात आले. 

                       

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .