साईसम्राटकडून कोरोनाच्या संकटात 100 अल्पभूधारक विद्यार्थ्याना मिळणार मोफत शिक्षण प्रशिक्षण व नोकरी ची संधी.

 साईसम्राटकडून कोरोनाच्या संकटात 100 अल्पभूधारक विद्यार्थ्याना मिळणार मोफत शिक्षण प्रशिक्षण व नोकरी ची संधी.


कराड - प्रतिनिधी, 

कोरोना व लॉकडाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.शेतकरी उत्पादक, शेती उद्योग, व्यापार, बँकिंग क्षेत्रात मोठ्या मंदीचा सामना करावा लागत आहे.शहरी भागाबरोबर ग्रामिण भागालाही लॉकडाऊन चा फटका बसला आहे.

  साईसम्राट इन्स्टिट्यूट ने परिस्थिती चा विचार करुन ऑगस्ट 2020 च्या शैक्षणिक शुल्कामध्ये मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना राबवली जाणार आहे व फि कपात केली जाणार आहे.

साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस हॉटेल, मेनेज्मेंट अँड शेफ किचन आर्टस च्या अध्यक्षा सुलोचना विजयसिंह पाटील व विश्वस्त शेफ  सम्राटसिंह  विजयसिंह पाटील यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून समाजहित व सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी 100 अल्पभूधारक  कुटुंबातील विद्यार्थ्याना शेफ किचन आर्टस व हॉटेल मेनेज्मेंट चे ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे व लॉकडाऊन कोरोनाच्या प्रादुर्भावातून बाहेर आल्यानंतर या 100 विद्यार्थ्याना फूड इंडस्ट्रीज,  स्टार हॉटेल्स , एअरपोर्ट, जहाजसेवा, रेल्वे - आर्मी कॅटरिंग, पर्यटन सेवा क्षेत्रात आय.टी.कंपनीज मध्ये नोकरी व ट्रैनिंग च्या हमखास संधी उपलब्ध करुण दिल्या जाणार आहेत.सर्व ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण शासनमान्यप्राप्त असेल व हे शिक्षण प्रशिक्षण देने साठी आंतराष्ट्रीय अनुभव असणारे शेफ उपलब्ध आहेत  अशी माहिती अध्यक्षा सुलोचना विजयसिंह पाटील यांनी दिली.

 विश्वस्त शेफ सम्राटसिंह वि.पाटील म्हणाले शेफ किचन आर्टस, हॉटेल व्यवस्थापनात,  पर्यटन सेवा क्षेत्रात लॉकडाऊन संपल्यानंतर अमर्याद जगभरात नोकरीच्या व व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत.अशी माहिती त्यानी  दिली.

     या सामाजिकहिताच्या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. या उपक्रमास मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील वि.पाटील , प्रा.विजय जाधव,तानाजीराव मोरे, साईजीत एक्सपोर्ट फूडस संचालक विलास झाडे, एम.ए.पाटील,  पंडित निकम, प्रा.सलील खोडे, प्रा.विक्रांत,श्रेया ढवळे ,  विक्री प्रमूख अमृता पाटील, शेफ इम्रान, शेफ खान यांचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती साठी -- 9822993500/

www.sibhmedu.org

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .