"प्रत्येक व्यक्ती हा समाजाचे चित्र आहे."___अभिनेत्री अश्विनी महांगडे.

 



"प्रत्येक व्यक्ती हा समाजाचे चित्र आहे."___अभिनेत्री अश्विनी महांगडे.

"सातारा येथील शासकीय पुरूष भिक्षेकरी गृहास  भेट."




   कराड -  प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर शेवाळे) 

आपण या लोकांना न कळत आपल्या आयुष्यातुन काढून टाकले पण इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा समाजाचे चित्र आहे त्या साठी राबणारे हात खूप मोलाचे आहेत असे प्रतिपादन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राणु आक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले. त्या  सातारा येथील शासकीय पुरूष भिक्षेकरी गृहाच्या भेटी प्रसंगी बोलत होत्या यावेळी महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, संस्थेचे अधिक्षक शिवाजी खुडे व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संस्थेच्या अडीअडचणी समजून घेतल्या, परिसरातील पाहणी करून सोयी सुविधा, वैद्यकीय सुविधा, बाबत प्रशंसा केली त्यानंतर  संस्थेच्या आवारात अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.... मोरया प्रोडक्शन हाऊस आणि अंशुल प्रोडक्शन लवकरच यांची गोष्ट समाजासमोर मांडतील असा विश्वास अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी दिला. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .