मणदूर येथे मिनी कोविड सेंटर सुरु.
मणदूर येथे मिनी कोविड सेंटर सुरु.
"मणदूर सारख्या छोठ्याशा गावाचा आर्दश तालुक्यातील इतर गांवानी घेणे गरजेचे."___तहसिलदार गणेश शिंदे .
प्रतिनिधी - गणेश माने (वारणावती)
माझे कुटंब माझी जबाबदारी ही संकल्पना लक्षात घेवुन मणदूर ग्रामस्थानी माझा गांव माझी जबाबदारी ही संकल्पना राबवाविण्याचा ध्यास घेत मिनी कोविंड सेंटर निर्माण संकल्प पूर्ण केला
मणदूर ता शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये पाच बेड , चार ऑक्सिजन सिलेंडर एक ऑक्सिजन मशिन सह कोविड प्राथमिक उपचार केंद्र सरपंच वंसत पाटील व ग्रामस्थ यांच्या मदतीने लाखो रुपायांचा निधी गोळा करून मणदूर प्राथमिक केंद्रात मिनी कोविड सेंटर निर्माण करण्यात आले याचा लोकार्पण सोहळा तहसिलदार गणेश शिंदे ,गटविकास अधिकार अनिल बागल व कोकरूड पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे म्हणाले मणदूर गावचा आर्दश हा मणदूर कोविड पॅर्टन तालूक्यात प्रत्येक गावंनी राबवावा असे अवहान त्यांनी या वेळी केले सध्या कोविड माहमारीच्या काळात सर्वाना बेड उपलब्द करु देणे अवघड बनले आहे आशा वेळी मणदूर ग्रामस्थानी आपल्या आरोग्याचा व समाजकल्याणाचा विचार करून लाखो रूपये निधी जमवुन व त्याची तात्काळ अंमल बजावणी करत ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उभ्या केलेल्या मिनी कोविड सेंटरचे कार्य कैतुकास्पंद असल्याचे उदगार काढले व स्वतः आणखीन दोन सिलेंडर तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले तसेच गटाविकास अधिकारी डाॅ. अनिल बागल म्हणाले कि प्रथम स्टेज मध्ये सर्वाधिक पेशंट सापडणाऱ्या मणदूर सारख्या छोठ्याशा गावाचा आर्दश सर्व गांवानी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंर्तगत येणाऱ्या सर्वच गांवाना याचा लाभ होणार असून कोविड काळामध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजावत असलेले डॉ . मजित परब यांचा सत्कार देखील त्यांनी केला तर कोकरूड पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी मणदूर गावाने कोविड काळात संपूर्ण बंद पाळत कायदयाचे व लोकांच्या आरोग्याची काळजी घेत माहमारीतुन बाहेर पडण्यासाठी जे योगादान व सहकार्य केले ते कौतुकास्पद होते या वेळी ग्रामविकास अधिकारी एम एन पाटील उप सरपंच विजय चौगुले कोंडीबा पाटील ,मोहन पाटील , पाडूरंग पाटील ,गणेश माने, सावळा पाटील , विष्णु पाटील , पोलिस पाटील पांडूरंग बडेकर ,राम पाटील हे उपस्थीत होते कार्यक्रमाचे आभार कृष्णकांत बेलवेकर यांनी मानले.
.

Comments
Post a Comment