Posts

Showing posts from December, 2021

GONDWANA BREAKING NEWS.

Image
                                   ब्यूरो  रीपोर्ट - शकूर मुल्ला.                   दिनांक ३१ डिसेंबर, २०२१, शुक्रवार. ● कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत ●  नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डीपर्यंतचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या टप्प्यातील केवळ ४५ किलोमीटरचे काम बाकी राहिले आहे ● राज्यात एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण १० हजार ७६४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, ७१९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे ● सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी कोकण किनारे गजबजले, ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी ● पुण्यातील येरवडा परिसरात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला; दोन पोलीस जखमी ● वैद्यकीय अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांच्या नव्या महाविद्यालयांच्या मूळ शुल्कात यंदा गेल्यावर्षीच्या त...

GONDWANA NEWS BREAKING .

Image
                                                  ब्यूरो  रीपोर्ट -  शकूर मुल्ला.                        दिनांक २९ डिसेंबर, २०२१, बुधवार. ● कंत्राटदार बदलले, गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणार, एकनाथ शिंदेचे विधानसभेत आश्वासन ● विमान कंपन्यांनी प्राधिकरणाचे २,३६२ कोटी रुपये थकविले ● ड्रग्ज तस्करीत उच्चभ्रू घरातील गृहिणी; वर्षभरात २३० जणांवर कारवाई ● कुपवाडमध्ये प्रेमी युगुलांची गळफास घेवून आत्महत्या, सावर्डे पाठोपाठ कुपवाड हादरले  ● थरार! चालकाने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली  ● विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट; नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे संकट ● राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती केली जाणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा  ● मुंबई...

गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.

Image
 गेट-टू गेदर दिलासा,विसावा,की नवी हुरहूर.                  ।।।। बॅच 1995/96।।।। शा   ळा या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण  विश्व सामावले आहे याची जाणीव आपल्याला शाळा सोडून काही वर्षे झाल्यानंतर समजले. तसे बऱ्यापैकी 25 वर्षाचा  मोठा कालावधी लोटून  गेला......असो         आपली शाळा स्व: दादासाहेब उंडाळकर माध्यमिक, उच्चमाध्यामिक विद्यालय उंडाळे सांगायचे तात्पर्य म्हणजे  10वीच्या व्हाट्सउप ग्रुपवर  गेट- टू गेदरची  पोस्ट पाहिली आणि मन भारावून गेले या निमित्ताने आठवणींच्या शाळेत जाण्याचे ठरवले व मन अगदी जुन्या आठवणीत रमून गेले. मनात अनेक जुन्या आठवणींची गर्दी झाली. ती अशी की शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांची होते अगदी तसे।              क्लास सुरू असताना एकमेकाकडे चोरून पाहणे,कागद, खडू फेकून मारणे, दुपारची बेल झाली की मधल्या सुट्टीतील एकत्रीत बसून मित्र मैत्रिणींचा वाटून खाल्लेला डबा, आजच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला त्याची चव येऊ शकत नाही....

पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे .

Image
  पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे.   ______महेंद्र लाड . कार्वे प्रतिनिधी:-  पर्यावरण संवर्धन हे समाजासाठी अत्यत महत्वाचे असल्याची जाणीव ठेवून महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य सुरु असुन हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी व्यक्त केले. तुपारी ता. पलूस ग्रामपंचायती मध्ये महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करणेत आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पलूस पंचायत समिती चे उपसभापती सुरेश खारगे, सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच सुनील पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. महेंद्र लाड पुढे म्हणाले की, धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने जी शिकवण दिली जाते त्यातून बंधुभाव निर्माण होऊन मानवता धर्माची जपणूक होते. तसेच पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड वसंवर्धनअभियानाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाज उपयोगी कार्याची माहिती...

GONDWANA BREAKING NEWS.

Image
                                   ब्यूरो  रीपोर्ट - शकूर  मुल्ला.                 दिनांक २४ डिसेंबर, २०२१, शुक्रवार.                                राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस. ● ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल ● आरटीई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शालेय शिक्षणंत्री वर्षा गायवाड यांनी जाहीर केले आहे. २८ डिसेंबरपासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाला सुरूवात होणार असल्यची माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली  ● चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी; राज्य सरकरने जारी केल्या नाताळ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना ● पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालया...

प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

Image
  प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. कार्वे प्रतिनिधी : प्रविण पाटील प्रदिप कुंभार यांना हॅपी टू हेल्प फाउंडेशन औरंगाबाद च्या वतीने औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे हा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला.या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.              औरंगाबाद येथील हॅपी टू हेल्प फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक  ,तसेच निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यासाठी प्रस्ताव व निबंध मागवण्यात आले होते.त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून शिक्षकांनी भाग घेतला होता. कमिटी तर्फ शिक्षकांची निवड करून   ४ राज्यस्तरीय ,१० जिल्हास्तरीय व निबंध स्पर्धेतील ७ असे एकूण २१ सत्कार मूर्तींचा  सत्कार फौंडेशन ने मान्यवरांच्या हस्ते केला.प्रदिप कुंभार यांची  मराठी माध्यम ज...

बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड.

Image
  बहुजन पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप महाजन यांची निवड . कराड - प्रतिनिधी   पत्रकारांच्या अडीअडचणी आणि अन्यायाविरोधात झगडणाऱ्या निर्भीड अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी मानवाधिकार न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी, तडसर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांची निवड करण्यात आली.  महाजन यांची निवड  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी ही निवड घोषित केली.  निवडीचे पत्र नुकतेच कराड येथील पत्रकार संघटनेच्या बैठकीत दिलीप महाजन यांना देण्यात आले आहे. महाजन यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,ॲडव्हान्स खबर चे संपादक अंश खलीपे, उंब्रज येथील पत्रकार रवींद्र वाकडे,  तिरंगा रक्षक शिराळा तालुका प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे, सांगली जिल्हा परिषद सदस्या एडवोकेट  शांता कनूंजे, ओगलेवाडी येथील जेष्ठ पत्रकार दत्ता जंगम,  कडेगाव येथील एडवोकेट कुलदीप महाजन,  माजी पंचायत समिती सदस्य दीपक ल...

विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार न्यूट्रीटीव्ह स्लाईस .

Image
  विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार न्यूट्रीटीव्ह स्लाईस . कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील      विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पोषण आहार मूल्ययुक्त न्यूट्रीटीव्ह स्लाईस संचालनालय स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये इयत्ता 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना हा न्यूट्रीटीव्ह स्लाईस आहार शाळेमध्ये भेटणार आहे. यामध्ये तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि सोयाबीन या पाचही प्रकारच्या  न्यूट्रीटीव्ह स्लाईस च्या प्रत्येक पॅकेटचे  वजन 120 ग्रॅम असणार आहे. प्रत्येक 120 ग्रॅम पॅकेटमध्ये 7.5 ग्रॅम वजनाच्या एकूण 16  न्यूट्रीटीव्ह स्लाईस असणार आहेत. इयत्ता 1ली ते 5वी च्या प्रती विद्यार्थ्यांना पाचही प्रकारच्या 120 ग्रॅम न्यूट्रीटीव्ह स्लाईसचे वाटप करावयाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.  इयत्ता 6वी ते 8वी च्या प्रति विद्यार्थ्यांना पाचवी प्रकारच्या 120 ग्रॅम लॉटरी ट्यूबस्लाइस चे वाटप करावयाचा तपशील खालीलप्रमाणे

कोकरूड येथे शिराळा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी बौद्ध संघटनांची बैठक संपन्न झाली.

Image
  कोकरूड येथे शिराळा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी बौद्ध संघटनांची बैठक संपन्न झाली. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.   शिराळा तालुक्यातील बौद्ध बांधवांची बैठक  दि. 21 डिसेंबर 2021 रोजी कोकरूड येथे संपन्न झाली. या बैठकीस शिराळा तालुक्यातील विविध आंबेडकरवादी बौद्ध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिराळा तालुक्यातील बौद्ध धम्म चळवळीची वाटचाल आणि वर्तमानात धम्मचळवळ कशी गतिमान करता येईल, या संदर्भात चर्चा झाली.     या बैठकीमध्ये धम्म चळवळ गतिमान करण्या संदर्भात शिराळा तालूक्यातील सर्व प्रमुख संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले आणि चर्चा करून जानेवारी महिन्यामध्ये 12 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी शिराळा तालुक्यामध्ये विराट बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्या संदर्भात चर्चा झाली.     ही बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्याच्या नियोजना संदर्भात रविवार, दि. 26 डिसेंबर रोजी बुद्ध विहार रिळे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये धम्म परिषदेच्या संयोजनाची संयोजन समिती गठित करण्यात येणार आह...

GONDWANA NEWS BREAKING

Image
                                ब्यूरो  रीपोर्ट - शकूर मुल्ला.                  दिनांक २२ डिसेंबर, २०२१, बुधवार. ● राज्यात 8 कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण, येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती  ● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ५० हजारांचा दंड, देशमुखांचे वकिल गैरहजर राहिल्याप्रकरणी चांदीवाल आयोगाची कारवाई ● आजपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार सुरु, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत ● राज्यात रोकशाही आणि रोखशाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ● तपासास राज्य पोलीस समर्थ, परीक्षा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळली ● अ‍ॅसीड हल्ला किंवा सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंड देण्याची तरतूद असणारा 'शक्ती कायदा' आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात संमत करणार : ...

उंडाळेत वडाप वाहतुकदारांची मनमानी.

Image
  उंडाळेत वडाप वाहतुकदारांची मनमानी. अँपे रिक्षा रस्तावर पार्किंग.. पोलीस प्रशासनाची चुप्पी, कारवाईची नितांत गरज. उंडाळे - गोंडवाना न्युज   उंडाळे ता.कराड येथील कराड-चांदोली मार्गावर सध्या अँपे रिक्षा वाहतुकदाराची मनमानी कारभार सुरु असुन वाहतुक नियमांना तिलांजली दिली जात आहे. गत दोन वर्षापुर्वी लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातुन पाचवड फाटा-चांदोली मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले असुन मुंबई-पुण्यातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी खुशकीचा मार्ग असल्याने सर्रास प्रवाशांनसह, अवजड वाहतुकही सध्या याचं मार्गावरुन केली जात आहे. या मार्गावर आसपासच्या परिसरातील वाडी-वस्त्यासाठी दळणवळण, शैक्षणिक व व्यापारासाठी महत्वपुर्ण बाजारपेठ म्हणुन उंडाळे कडे पाहण्यात येते, मात्र सध्या उंडाळे बसस्थानकावर खाजगी वाहतुकदाराची मनमानी कारभार चालला असुन,रस्त्यामध्ये कुठेही, कसेही वाहनाचे पार्किंग केले जात आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुस रस्ते प्राधिकरणाने फुटपाथ वजा नाल्याचे बांधकाम केले असुन सदरिल फुटपाथवर उंडाळे बस स्थानकावरील अँपेरिक्षा वाहतुकदाराचा "रिक्षा युनियनचा" बोर्ड लावण्यात आला आहे, मात्र या युनियन मार...

GONDWANA NEWS BREAKING.

Image
                      ब्यूरो  रीपोर्ट - शकुर मुल्ला.                     दिनांक २१ डिसेंबर, २०२१, मंगळवार. ● राज्य सरकारचा मोठा निर्णय; टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित ● ओबीसी आरक्षण, परीक्षा गैरव्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, बुधवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ● विविध वित्तीय संस्थां, उद्योगांच्या माध्यमातून राज्याचे वैभव गुजरातला पळविले; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे  केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर ● मुंबई : पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या मात्र बस बंदच, विद्यार्थ्यांचे हाल; वाहतूक साधनांची कमतरता, एसटी संप आणि लोकलमधील वाढत्या गर्दीचा फटका  ● पुणे : वाहन क्रमाकांच्या पाटीतील बदलांमुळे शिस्तप्रिय वाहनचालकांना मनस्ताप; ई-चलन कारवाईबाबत आठ हजार वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांकडे तक्रारी ● कोल्हापूर जिल्‍हा बँक निवडणूक : कागलमधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील...

जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांची वरूण येथील कुस्ती मैदानास भेट.

Image
  जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक  यांची  वरूण   येथील  कुस्ती मैदानास भेट. कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे.  वरूण(ता. शिराळा) येथे जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यावेळी विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, संभाजी मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

Image
  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न. कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे. तांबवे (ता. वाळवा) : नरसिंह मंदिर सभामंडप व संरक्षक भिंत बांधणे या 15 लाख रुपये कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृष्णा कारखाना संचालक संभाजी पाटील, विक्रमसिंह पाटील, सरपंच सुषमा भंडारे, उपसरपंच अवधूत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश जाधव, विक्रम चव्हाण, सोसायटी माजी अध्यक्ष अशोकराव मोरे, के. डी. शेळके, बाजार समितीचे माजी सदस्य तानाजी मोरे, राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपटराव जगताप, धोत्रेवाडी माजी सरपंच प्रदीप माने, मोहनराव जगताप, बालाजी जगताप, केशवराव सोसायटी माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, संभाजी, अनिल, सदाशिव, संजय, अवधूत, ओंकार, अनिल  दिलीप व संजय जाधव, शंकर तोडकर, विकास शेळके, हणमंतराव निकम आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर तांबवे येथे दत्त जयंती निमित्त महाप्रसाद होता. त्या ठिकाणी आमदार नाईक यांनी भेट दिली. या वेळी त्यांचा दत्त कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळा...

आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा सत्कार समारंभ संपन्न .

Image
  आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा  सत्कार समारंभ संपन्न . कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात आज सांगली जिल्हा मध्यवती सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार मानसिंगराव नाईक व संचालक सत्यजीत देशमुख यांचा शिराळा तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांमार्फत सत्कार संपन्न झाला. यावेळी सत्कारार्थ आमदार मानसिंगभाऊ व संचालक देशमुख यांचे भाषण झाले. यावेळी तालुक्याच्या मनिषाताई गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, शिराळाच्या नगराध्यक्ष प्रतिभा पवार, शिराळा शेतकरी सूतगिरणी अध्यक्ष सुरेश चव्हाण, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील, सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ, शिराळा पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. गजेंद्र लोहार, पी. एस. आय. अविनाश वाडेकर, बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील, एस. एम. काटे, पी. वाय. सूर्यवंशी, आबा माने, अशोक माने, बी.ए. कोळी यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोडोलीत दत्त जयंती उत्साहात संपन्न.

Image
  कोडोलीत दत्त जयंती उत्साहात संपन्न. कार्वे प्रतिनिधी :-  कोडोली ता. कराड येथे दत्त जयंती उत्‍साहात संपन्‍न झाली. दत्त मंदिर हे कोडोली गावामध्ये कृष्णा नदीच्या तीरावरती निसर्गमय ठिकाणी आहे .दत्त जयंतीचे औचित्य साधून दत्तमंदिराच्या नवीन सभामंडप लोकवर्गणीतून बांधण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण दत्त मंदिर रंगरंगोटी करून दत्त मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर आकर्षक रांगोळी काढली गेली. तसेच रंगीबेरंगी फुलांच्या मातीच्या कुंड्या मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी दत्तांच्या पालखीचे संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मोत्सवाच्या पाळण्याचा कार्यक्रम दत्त मंदिरात संपन्न झाला. दत्त नामाच्या जयघोषाने कोडोली नगरी दुमदुमली होती. तसेच संध्याकाळी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादा मध्ये गोड खिरीचा आस्वाद कोडोलीतील सर्व दत्त भक्तांनी घेतला. त्याचबरोबर सकाळपासून दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी दत्तभक्त येत होते. संध्याकाळी एकतारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 21 शाळांची निवड.

Image
  इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 21 शाळांची निवड. कार्वे प्रतिनिधी :- ( प्रविण पाटील) इन्स्पायर अवॉर्ड नामांकन सन 2020- 2021 साठी जिल्ह्यातील 2203 उपकरणांची नामांकन करून नानाविध उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यापैकी 208 उपकरणांची निवड जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रदर्शनासाठी झालेली होती. यांची तज्ञ समितीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षण करून उत्कृष्ट 21 उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत इन्स्पायर अवॉर्ड मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अधिकाधिक पाच विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असते. नवनवीन विचार संकल्पना तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी उपकरणे बनविणे अपेक्षित असते. त्यासाठी नामांकनातून निवड झालेल्या 208 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस मूल्य जमा करण्यात आले होते. त्या सर्वांना मार्गदर्शन शिक्षकांच्या वतीने उपकरणे तयार करून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तर...

GONDWANA NEWS BREAKING .

Image
                          ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.   ● मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं ● ओबीसी आरक्षण कायमचे संपविण्याचा राज्य सरकारचा कट, भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप  ● १० वी आणि ११ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा ● मी राज ठाकरेंसोबत कायम राहणार, पक्षांतराच्या केवळ अफवा, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे स्पष्टीकरण  ● साखर कारखान्यांसाठी चांगली बातमी, मिश्रित इथेलॉनवरील जीएसटीत १३ टक्क्यांनी कपात, केंद्र सरकारचा निर्णय  ● राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प, ग्राहकांचे हाल    ● लससंशोधन केंद्र उभारण्यासाठी ‘सीरम’तर्फे ऑक्सफर्डला ५०० कोटी, नवे लससंशोधन केंद्र उभारण्याची ऑक्सफर्ड विद्यापीठाची घोषणा   ● गर्भवती पत्नीसह पतीची आत्महत्या, बीड येथील धक्कादायक घटना, स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू ● काँग्रेस नेते हार्दिक पट...

बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार. सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी.

Image
  बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार.               'सर्वोच्च न्यायालयाने   दिली सशर्त परवानगी.' ब्यूरो रिपोर्ट - गोंडवाना न्यूज.      बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी मिळाली बैलगाडा शैकिनांच्या संघर्षाचा व एकीचा मोठा विजय झाला.सुप्रिम कोर्टाने बैलगाडा चालक,मालक, व शौकीन यांना बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली.                   महाराष्टात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीस बंदी घालण्यात आली होती.बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळावी यासाठी बैलगाडा मालक,चालक,व शौकीन यांचा मोठया प्रमाणात संघर्ष सुरू होता. कित्येकदा निर्बंध डावलून देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते.त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.                  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली.

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा उडणार धुरळा.

Image
  महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा उडणार धुरळा. सुप्रीम कोर्टाची  सशर्त  परवानगी, बैलगाडी प्रेमींसाठी मोठी बातमी.        ब्यूरो रिपोर्ट - गोंडवाना न्यूज.   महाराष्ट्रात  बैलगाडी शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार  आहे.  सर्वोच्च   न्यायल्याने दिली सशर्त परवानगी.   कोर्टाने घालून दिलेल्या नियम,अटी, व शर्ती याचे पालन करुन हा थरार अनुभवला पाहिजे .              

GONDWANA NEWS BREAKING.

Image
                                                       ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.                                   16डिसेंबर, गुरुवार ● बेस्ट उपक्रमाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील २,२३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. ● निर्माता विक्रम धाकतोडेला शारिरीक शोषण अन् विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे  ● संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात; सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ; २५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस ● राज्यात ओमायक्रॉनचे आणखी चार रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या झाली ३२; दोन रुग्ण उस्मानाबाद, तर मुंबई आणि बुलडाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला ● फोन टँपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची व तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची आय...

रिळे (ता. शिराळा ) येथे महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

Image
  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या 2515निधीतून  बांधण्यात येणाऱ्या महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे. रिळे (ता. शिराळा ) : येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या 2515 योजनेतून 8.47 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या महादेव मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन युवक राष्ट्रवादी काँग्रेसे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच आशाताई आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ, माजी सरपंच एम. एस. पाटील, पोलिस पाटील सुधीर पवार, भैरवनाथ पाणीपुरवठा माजी अध्यक्ष भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोविंद पाटील, दिपक दोडके, सुवर्णा पाटील, श्रीकांत पाटील, रघुनाथ बंडगर तसेच बाळकृष्ण खामकर, रघुनाथ सुतार, सुभाष सुतार, वैशाली देशमुख, दिनकर पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अस्मिता मोरे हिची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

Image
  अस्मिता मोरे हिची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील                  ऑनलाइन झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर  अवॉर्ड स्पर्धा 2020-2021 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली ता. कराड येथील अस्मिता भागवत मोरे इयत्ता सातवी या विद्यार्थिनीने तयार केलेल्या 'फार्मर युटिलिटीज' या उपकरणाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला मार्गदर्शन जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षकांचे व  विद्यार्थिनीचे  अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

GONDWANA NEWS BREAKING..

Image
                          ब्यूरो रीपोर्ट - शकुर मुल्ला.               दिनांक १५ डिसेंबर, २०२१, बुधवार. ● मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले, तर कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त ● पोलिसांच्या पदोन्नतीची रखडपट्टी; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे ४५ हजार अंमलदारांचे स्वप्न लाल फितीत ● बोगस डिग्रीप्रकरणी वसई-विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या; सुनील वाडकर असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. ● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही; चांदीवाल आयोगासमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे स्पष्टीकरण ● मंत्रालयात विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना २०० रुपयांचा दंड; मंत्रालय पोलिसांची कारवाई  ● सोलापूरमध्ये बोगस कंपनीच्या आधारे जप्त साखर कारखान्याची कोट्यावधींची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; लातूरच्या दोघांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल ● राष्ट्...