पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी.
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी. सातारा दि.31 (जिमाका): शासनाच्या आदेशानुसार राज्यातील कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून सदर लॉकडाऊन कालावधी 31 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्हयात 1 जानेवारी 2021 रोजीचे 00.00 वाजले पासून ते 31 जानेवारी 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत. सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट तसेच इयत्ता 9 ते 12 चे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह वगळून) या बंद राहतील. तथापी ...