चिंचोली ता- शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
चिंचोली ता- शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
शिराळा - प्रतिनिधि,
चिंचोली ता. शिराळा जि. सांगली या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सरपंच अरुण कुमार सकटे , शिराळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. रवी पाटील , संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे मा.रवींद्र कोकाटे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सकटे सर यांनी केले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यासाठी व परिवर्तनवादी समाज घडविण्यासाठी आदरणीय पंडित लोंढे गुरुजी यांनी अभिवादनाच्या कार्यक्रमा दिवशी अण्णाभाऊ साठे नगर मधील मुलांना वाचनालयासाठी रुपये पंचवीस हजाराची पुस्तके देऊन महान कार्य केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन धडाडीचे कार्यकर्ते सुनील घोलप यांनी केले होते. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चिंचोली गावातील अनेक कार्यकर्ते तसेच अण्णाभाऊ साठे नगर मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Post a Comment