गावाचा निधी कोठे, कसा, किती खर्च केला?
गावाचा निधी कोठे, कसा, किती खर्च केला?
ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील,
एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. 23 ते 30 डिसेंबर असून दि. 25, 26 व 27 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून. नामनिर्देशन छाननी करण्याचा दि. 31 डिसेंबर, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दि. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मतदान दि. 15 जानेवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. मोतमोजणी दि.18 जानेवारी 2021 होणार तर 21 जानेवारी ला निकाल होणार आहे," पण एखाद्या गावाचे बजेट कसं ठरतं , प्रत्यक्षात विकासकामासाठी निधी मिळतो का? किती मिळतो? ग्रामपंचायत मिळालेला निधी कसा, व किती ,कोठे खर्च करते? याविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत.
गावचं बजेट कसं ठरतं , ?
प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर - नोव्हेंबर मध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलवली जाते, त्या मध्ये गावातील महिला कल्याण, शिक्षण, आरोग्य सह अनेक विषयावर चर्चा केली जाते, त्याच बरोबर या गरजावर खर्च करण्यासाठी किती निधी शिल्लक आहे , तो पाहुन सरकारकडुन किती निधी अपेक्षित आहे, याचं अंदाजपत्र तयार करण्यात येते. सगळ्या योजनाचे अंदाजपत्रक डिसेंबर31 पर्यंत पंचायत समितीकडे पाठवणे आवश्यक असतं , हे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजुरीसाठी राज्य सरकार कडे पाठवते. कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, ही त्या,त्या गावे कोणत्या जिल्हात येते , त्यांची भौगोलिक स्थिती ,यावर ठरतं. " जर संबंधित योजना राज्य सरकारची असेल तर 100 % निधी राज्य सरकार देते. आणि जर केंद्राच्या बहुतांश योजना 60% केंद्र सरकार, तर इतर 40% राज्य सरकार देते. 1 एप्रिल 2020 पासुन 15 वित्त आयोग सुरु झाला असुन त्यानुसार सरकार गावातील प्रती माणसी 957 रुपये देत आहे. तर 14 व्या वित्त आयोगात प्रती व्यक्ती 488 रुपये दिला होता. त्यातील 25% मानवविकास, 25% कौशल्य विकास, 25% केंद्र व राज्य सरकारचा समन्वय, आणि25% पायाभूत सुविधावर खर्च करण्यास सरकारने सांगितले होते. आता 15 व्या वित्त आयोगाअंर्तगत एकुण गावाला मिळालेल्या निधी पैकी 50% निधी पाणीपुरवठा, स्वच्छता बाबीवर खर्च करण्यास सांगितले आहे, तर 50% निधी इतर बाबीवर खर्च करायचा आहे.
केंद्र, राज्य सरकारकडून ग्रामपंचायतीस विविध योजनेअंतर्गत किती निधी मिळाला? संबंधित ग्रामपंचायतीने तो कोठे, कसा व किती खर्च केला यांची सर्वसामान्याला संपुर्ण माहिती मिळावी या हुतुने पंतप्रधान यांनी 24 एप्रिल 2020 रोजी पंचायत राज या दिवशी ग्राम- स्वराज मोबाईल एप्लिकेशनचे लोकार्पन करुन सामान्यातील सामान्य जनतेस आपल्या पंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आहेत, त्या कशा प्रकारे राबविण्यात येत आहेत. यांची माहिती उपलब्ध होवु लागली आहे.

Comments
Post a Comment