शिराळा तालुक्यात रेशनिंगचा चाळीस टन तांदूळ सापडला सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई .
शिराळा तालुक्यात रेशनिंगचा चाळीस टन तांदूळ सापडला
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार )
शिराळा तालुक्यातील बिऊर येथील राईस मिलवर छापा टाकून बारा लाख रुपये किमतीचा चाळीस टन रेशनिंगचा तांदूळ जप्त करण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून दोन दिवसापूर्वी लक्ष्मी फाटा येथे सहा लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला होता तिन दिवसात अठरा लाखाचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप वीरभद्र कानकात्रे आणि प्रवीण वीरभद्र कानकात्रे दोघेही राहणार नाझरे गल्ली शिराळा यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे बुधवार दि.२ रोजी लक्ष्मी फाटा येथे सांगली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सहा लाख रुपये किमतीचा वीस टन तांदूळ जप्त केला होता रमेश बाबू गुंडेवाडी राहणार सलगरे प्रकाश केरबा पाडुळी आणि विजय दत्तात्रय शिंदे दोघे राहणार हरिपूर यांना अटक करण्यात आली होती यावेळी तांदूळ शिराळा येथे घेऊन जात असल्याचे संशयीतांनी सांगितले होते त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नित्यानंद झा , पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, सचिन मोरे, शंतनू ढवळीकर, अविनाश कदम, महसूल विभागाचे दत्तात्रय बोरसे, चंद्रकांत मोहोळकर या पथकाने ही कारवाई केली.
सिद्धेश्वर राईस मिलच्या गोडाऊन मधील चाळीस टन तांदूळ जप्त करुन सिल करण्यात आले आहे या मिलमध्ये रेशनिंगचा तांदूळ कोठून येतो याचा तपास सुरू करण्यात आला आहे दोन्हीही कारवाईमध्ये अठरा लाखांचा साठ टन तांदुळ जप्त करण्यात आला आहे.

Comments
Post a Comment