कराडचे तहसिलदार यांना निवेदन. " बेलवडे बुद्रक ता - कराड या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी प्रदीप मोहिते यांनी दिले निवेदन."

 


कराडचे तहसिलदार यांना निवेदन.

" बेलवडे बुद्रक ता - कराड या  ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून  दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी प्रदीप मोहिते यांनी दिले निवेदन."



उंडाळे -प्रतिनिधी(प्रदिप पाटील).

ग्रामपंचायतीच्या  गैरकारभाराची  चौकशी होऊन  संबंधित लोकांच्यावर कारवाई व्हावी यासाठी बेलवडे बुद्रुक चे रहिवासी प्रदीप बाळकृष्ण मोहिते यांनी  कराडचे तहसीलदार यांना निवेदन दिले.या निवेदनात मोहिते यांनी  असे म्हटले आहे की  सदर   बेलवडे  बुद्रुक ग्रामपंचायत  अंतर्गत प्रोसिडिंग मिटींग व ग्रामसभा यांचेमार्फत घेतलेले ठराव व मंजूर केलेली कामे यांच्या जमा खर्चात गैरकारभार झाल्याचे दिसून आले आहे याचे पुरावे वारंवार  पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना देऊनही त्यांच्याकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. सन २०१५ ते २० या कालावधीमध्ये बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभारा  बाबत संबंधित व्यक्तींवर  योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा लाक्षणिक उपोषण व त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असं निवेदनामध्ये म्हंटले आहे.














Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .