तुळसण जि.प.प्राथ.शाळेचे यश प्रेरणादायी :श्रीमती जमिला मुलाणी मॅडम.

 तुळसण जि.प.प्राथ.शाळेचे यश प्रेरणादायी :श्रीमती जमिला मुलाणी मॅडम.

       

उंडाळे - प्रतिनिधि,

 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प. प्राथमिक शाळा तुळसण  या शाळेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२० व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये अभूतपूर्व यश संपादन केले.त्याबद्दल कराड पंचायत समिती शिक्षण विभाग व ग्रामपंचायत तुळसण यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव सत्कार सोहळा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून अतिशय उत्साहवर्धक - प्रेरणादायी वातावरणात शालेय प्रांगणात संपन्न झाला.

        पंचायत समिती कराड,काले बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय जमिला मुलाणी मॅडम यांनी    सुमित माने -२५८ गुण(तालुक्यात प्रथम व नवोदय निवड), कु.राधिका नानेगांवकर -२५२ गुण( नवोदय विद्यालय निवड ), राज वीर-२४८ गुण( नवोदय विद्यालय निवड),ओम गुरव -२४६ गुण, अनिरुद्ध कोरडे -२३४ गुण , हर्षद मोरे -२३४ गुण, सुयश वीर -२३४ गुण, कु. सानिका माने -२२८ गुण, कु. हर्षदा वीर-२२६ गुण, साईराज कोरडे -२२६ गुण हे  आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व तीन (३) विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झाले. ही बाब आपल्या तालुक्याला व जिल्ह्याला प्रेरणादायी असल्याचे म्हंटले. शिक्षक , विद्यार्थी व पालक यांनी जे अहोरात्र कष्ट घेतले. त्याचे  फलीत म्हणजे आजचे हे यश आहे. असेही त्या म्हणाल्या.

          विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घर -संसार ही दुय्यम बाजू मानून केवळ विद्यार्थी प्रगती हा ध्यास मनाशी बाळगला.त्या *मार्गदर्शक शिक्षिका सौ. सविता राजमाने मॅडम व श्री. राजेंद्र चव्हाण सर ,मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण थोरात सर ,माजी मुख्याध्यापक श्री.विश्वनाथ कुंभार सर यांचा यथोचित सत्कार शिक्षण विभाग पं.समिती कराड , शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ तुळसण यांच्या वतीने करण्यात आला.

       हे यश मिळण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर मॅडम यांची प्रेरणा तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय जमिला मुलाणी मॅडम व केंद्रप्रमुख आमणे साहेब यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन निश्चितच मोलाचे ठरले असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.मनिषा शेडगे मॅडम यांनी केले व आभार सतीश गाडेकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .