जि.प., पं.स. निवडणूकीची रंगीत तालीम... आरक्षणावर डोळा, इच्छुकांची तयारी सुरू...
जि.प., पं.स. निवडणूकीची रंगीत तालीम, ग्रामपंचायत निवडणूक.
"आरक्षणावर डोळा, इच्छुकांची तयारी सुरू."
उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदिप पाटील)
कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे आगामी काळात भावकी गावकीच्या राजकारणाला वेग येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत ११ डिसेंबर पासुन आचारसंहिता लागु करण्यात आली असुन २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्दशन करव्याचे आहेत. दि. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी तर दि.४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दि.४ जानेवारी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप व उमेदवारांची यादि जाहिर करण्यात येणार आहे. दि.१५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी निकाल जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कराड दक्षिणेत येळगाव जि.प. गटामध्ये उंडाळे, जिंती, सवादे, घोगाव , आकाईचीवाडी, साळशिंरबे, महारुगडेवाडी, शेळकेवाडी, लटकेवाडी, गोटेवाडी, भुरभुशी, , शेवाळवाडी ,टाळगाव, भरेवाडी या गावचा समावेश होत असुन स्थानिक पातळीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण निर्मिती होऊ लागली आहे.
कराड दक्षिणेतील गेल्या तीस वर्षोत माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचा अभेद्य गड म्हणुन येळगाव जि.प कडे पाहण्यात येत होते, मात्र गत आमदारकीच्या दोन टर्म पासुन अभेद्य म्हणवण्या-या या गडात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदार्पणाने २०१४ बदललेल चित्र पहावयास मिळते .त्यातच भाजपाचे अतुल भोसले यांनी येळगाव जि.प मध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी झाल्याचे दिसुन येते.
राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाआघाडीचा बोध घेत जिल्हा,तालुका, व गाव पातळीवर वेगवेगळी समिकरणे उदयास आली. त्याच प्रमाणे वर्षानुवर्ष राजकीय वैर असणारे बाबा-काका गटाचे वैर प्रितीसंगमच्या साक्षीने गत महिन्यात संपुष्टात आणत नव्या जोषाने दक्षिणेतील हे दोन गट एकत्र झाले असुन या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील उंडाळकर नव्या दमाने 'रयत' संघटनेचे कार्यकर्ते व आ.चव्हाण कार्यकर्ते यांच्यात सांगड घालत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवण्यात आघाडीवर दिसुन येणार आहेत तर भाजपा पुरस्कृत असणारे अतुल भोसले' थेंबे-थेंबे तळे साचे' ह्या प्रमाणे पक्ष, हाँस्पिटल, कारखाना माध्यमातून गाव-गाव वाडी-वस्तीवर रचनात्मक, विधायक व सामाजिक कामांना प्राधान्य दिल्याने गावोगावी मजबुत कार्यकर्ते संघटन व जोरदार फळी तयार करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उंडाळकर गटाशी फारकत घेत गत निवडणुकी पासुन अलिप्त राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील सध्या राष्टवादी काँग्रेस मध्ये असून यांची भुमिका गुलदस्तात दिसुन येत आहे. आपल्या शिलेदारासह कोणाच्या मदतीला उभे राहतील का? आपला वेगळा सुभा माडंतील का? वरिष्ठ पातळीवरील आदेश पाळतील हे पाहणे अैाचित्याचे ठरणार आहे.
होवु घातलेली ग्रामपंचायत निवडणुक हि येळगाव जि.प मध्ये स्थानिक गावामधुन गावकी-भावकी रंगणार असुन त्यामध्ये पक्ष, गट, नेते याच्यासह भावकी दोस्ती-दुश्मनची सागंड पाहण्यासह तर काही तटस्त लोकशाहीची मुल्य जपत सोयी-सुविधाची कास धरत विकासकामांना महत्व देत भविष्याचा वेध घेत ग्रामपंचायत निवडणूकीत नेतृत्व निवडतील असा एक कल समाजामध्ये दिसून येतोय.
यामुळे पारंपारिक पध्दतीने सामोरे जाण्याची ग्रामपंचायत निवडणुकीत जी पद्धत आहे त्यात यंदा बदलेल का तीच राहील या निवडणुकीत पाहणे औचित्याचे ठरेल. वाढीव तरूण मतांचा कुणाला फायदा होईल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीच्यासाठी या ग्रामपंचायत निवडणूका महत्त्वाच्या असणार आहेत.

Comments
Post a Comment