स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक, मतदारांचा वैचारीक सहभाग महत्वाचा.

 स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक, मतदारांचा वैचारीक सहभाग महत्वाचा.



प्रतिनिधि- प्रदीप पाटील.

निवडणुका जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसा गावपातळीवर राजकीय नेत्यांसह, पुढाराच्या कलगीतुऱ्यालाही जोर येईल. एवढेच नव्हे तर ज्यांनी आतापर्यंत एकमेकांना आपले एक नंबरचे शत्रू मानलेले असेल ते शत्रूदेखील मित्र होऊ शकतील. केसाने गळा कापला अशी भाषा वापरणारे हे नेते,पुढारी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांच्या गळ्यात मोठमोठाले हारही घालतील.

 भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व्यवस्था मानली जाते. लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरीता त्यांच्याकडून अनेक प्रयोग होत राहातील.सर्वसामान्य माणूस जो या निवडणुक प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा घटक असतो. त्याचा विचार न करता राजकीय नेते आणि राजकीय पक्ष जेव्हा हा सगळा खेळ खेळतात त्यावेळेला लोकशाहीच्या विरूद्ध वर्तन दिसून येते. वीस -तीस वर्षीपुर्वी  काही प्रमाणात तत्वाधिष्ठित असलेले  राजकारण इतके बदलले की राजकारणाचा आणि तत्वाचा सूतराम संबंध नाही. 

हे सिध्द करण्याची सर्वच राजकीय पक्ष व स्थानिक नेत्यामध्ये स्पर्धा लागली आहे. आणि मग इतरांपेक्षा आपण कसे स्वार्थी आहोत किंवा राजकारणाचा उपयोग करून आपला पक्ष किंवा आपला नेता हा इतरांपेक्षा कसा जास्त पैसा कमावू शकतो. हे दाखवून देण्यात धन्यता मानली जाऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

   खरे तर भारतासारख्या देशात लोकशाही कार्यपध्दती आहे असे म्हटल्यावर खऱ्या अर्थाने राजकारणाचे लोकशाहीकरण व्हायला हवे होते. म्हणजेच या पक्षांच्या अंतर्गत व्यवहारांमध्येसुध्दा लोकशाहीमूल्य रुजायला हवी होती. परंतु तसे काहीच घडले नाही. उलट त्या मूल्यांना हद्दपार करून हुकुमशाही प्रवृत्ती वाढीला लागली. त्यातून मग एक नेता, एक पक्ष त्या नेत्याची घराणेशाही अशा चक्रव्यूहामध्ये भारतीय लोकशाही भरडली गेली. इतक्या उघडपणाने लोकशाहीचा बाजार मांडला गेला असताना प्रत्येक निवडणुक ही लोकशाहीचा कसा मानदंड आहे. हे भासवण्याचा तितकाच स्वार्थी उद्योग या लोकांकडून केला जावा हे आणखीनच संतापजनक ठरते. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर लोकशाहीचा काही मुठभर राजकीय पक्ष किंवा राजकीय घराणी उपयोग करून घेत असतील तर त्या लोकशाहीची मुक्तता करण्याची वेळ आली आहे. सातत्याने सुरु असलेली तिची घुसमट थांबवली गेली पाहिजे. यासाठी निवडणुकांपुरती लोकशाही असे जे काही चित्र निर्माण झाले आहे ते बदलावे लागेल. किंवा निवडणुक सुधारणा करून मुठभरांकडून केला जाणारा लोकशाहीचा वापर थांबवावा लागेल.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .