पेरू पिकाची लागवड. उत्पादन,मशागत,रोग व इतर.


पेरू पिकाची लागवड. उत्पादन , 







ब्युरो रिपोर्ट  - प्रदीप पाटील ,

पेरू या पीक लागवडीच्या संदर्भात   उपयुक्त माहीती,



जमीन  

      पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन

जाती - 


      सरदार (एल -४९)



लागवडीचे अंतर -


      ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि.  सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.

खते  - 


      पूर्ण वाढ झालेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश, झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावीत पैकी निम्मा नत्र बहाराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.

उत्पादन  -

७०० ते १५०० फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात. 

कीड व रोग नियंत्रण  - 


  1. पिठ्या ढेकूण - पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसिलीयम लेकाणी (फुले बर्गासाईड) – ४० ग्रॅम १०० मि.ली. दुधात मिसळून १० लिटर पाण्यात फवारावे.
  1. फळमाशी - फळमाशीचे नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा.
  1. मर रोग - मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१०० ग्रॅम/झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावे किंवा बोर्डो मिश्रण (१%) द्रावणाची मातीत जिरवणी करावी.
  1. फळावरील डागांसाठी बाविस्टीन (०.१ %) + मॅन्कोझेब (०.२ %) ची फवारणी करावी.
 
इतर महत्त्वाचे - 


बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी २-४-५ टी ७० पीपीएम या संजीवकाची फवारणी करावी.
 
 
 
 


source- www.krishi.maharashtra.gov.in

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .