मोरगिरीचे ग्रामदैवत भैरवनाथ,जोगेश्वरी व सिद्धेश्वर देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द.
मोरगिरीचे ग्रामदैवत भैरवनाथ,जोगेश्वरी व सिद्धेश्वर देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द.
मोरगिरी - वार्ताहर ( किशोर गुरव)
मोरणा वीभागातील मुख्य गाव असलेले मोरगिरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ,जोगेश्वरी व सिद्धेश्वर देवाची मंगळवार दि.१५/१२/२०२० व बुधवार दि.१६/१२/२०२० रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे अशी माहिती यात्रा कमेटी मोरगिरी यांनी दिली आहे. सालाबाद प्रमाणे मोरगिरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ,जोगेश्वरी व सिद्धेश्वर देवाची यात्रा देवदीपावली या दिवशी आरंभ होतो व दुसर्या दिवशी मोठ्या उत्सहात यात्रा साजरी होत असते याच पार्श्वभूमीवर यात्रा कमेटी मोरगिरी,माणगाव,पेठ्शिवापूर व मोरेवाडी यांनी भैरवनाथ मंदिरात घेतलेल्या मिटिंग मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.देवाचे विधिवत पूजा,आरती व पालखी हे कार्यक्रम मानकरी व देवाचे पुजारी करतील तर सालाबाद प्रमाणे सर्वच मनोरंजनाचे तसेच कुस्तीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.याची सातारा,कराड,पाटण व मोरणा विभागातील भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहान यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment