शेतकरी आंदोलनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहून दानवेंना पोटशूळ उठलाय -उत्तरेश्वर कांबळे .

 शेतकरी आंदोलनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहून दानवेंना पोटशूळ उठलाय -उत्तरेश्वर कांबळे .



ब्यूरो रीपोर्ट - प्रा.( डॉ ) विनोद कांबळे. 

             कृषी प्रधान देशात उद्योगपतींचे खिसे भरणारे नवीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून राजधानी दिल्लीत  शेतकरी आंदोलन सुरू असून ,  पंजाब मधून शेतक-यांनी या आंदोलनाला सुरूवात केली आहे. देशभरातून आंदोलनाला प्रचंड  उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ,हे पाहून भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री  आणि घोर शेतकरी विरोधी रावसाहेब दानवे यांना पोटशूळ  उठला आहे. म्हणूनच ह्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानाचा हात असल्याचे अत्यंत निंदनीय व  वादग्रस्त विधान त्यांनी भोकरदन तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य केंद्र इमारतीच्या लोकापर्ण कार्यक्रमात बोलताना केले आहे.भीम आर्मी भारत एकता मिशन ह्या दानवेंच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष आणि आझाद समाज पक्षाचे राज्य युवा नेते मा.उत्तरेश्वर कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. वास्तविक पाहता रावसाहेब दानवे ह्या व्यक्तीचं डोकं ठिकाणावर नसून त्यांना वयाच्या मानाने मानसोपचाराची अंत्यत गरज आहे , अशी खरमरीत बोचरी टीका सुद्धा मा.उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे. अधिक बोलताना मा.उत्तरेश्वर कांबळे म्हणाले की, दानवे नेहमीच शेतकरी व भारतीय जवानांबद्दल वादग्रस्त  विधाने  करतात .

त्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाकडून पॅकेज दिलं जातं की काय ?असा आम्हाला संशय असल्याचे सांगून कांबळे म्हणाले की , दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आमच्या सुमारे 13 शेतक-यांचे निधन झालेले असुन बेताल दानवेंनी तमाम शेतक-यांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी देशातील शेतक-यांची जाहीर माफी मागितली पाहिजे नाहीतर भीम आर्मीच्या वतीने  दानवेंच्या तोंडाला काळं फासण्यात येईल असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .