मणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव ग्रामसभेने अखेर फेटाळला.

 मणदूर ग्रामपंचायतीचे  सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव ग्रामसभेने अखेर फेटाळला.

" विशेष ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच वसंत पाटील २६१ मतांनी विजयी घोषित ".


 शिराळा - प्रतिनिधी ( आनंदा  सुतार)
मणदुर ता. शिराळा येथील सरपंच यांचे विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज विशेष ग्रामसभेत २६१ मतांनी फेटाळून लावला.
सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे असा ठपका ठेवत ११ पैकी ९ सदस्यांनी सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.त्याला संमती घेण्यासाठी आज वारणावती ता. शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कुल तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्यात आली. २५१० मतदारांपैकी १३१२ मतदारांनी या ग्रामसभेसाठी उपस्थिती दर्शवली. दुपारी एक ते पाच या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. संध्याकाळी पाच नंतर लगेचच मतमोजणी झाली. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने ५११     मते तर अविश्वास ठरावाच्या विरोधात ७७२ मते पडली २९ मते अवैध ठरली २६१ मतांनी हा अविश्वास ठराव नामंजूर झाला .अध्यासी अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी निकालाची घोषणा केली. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे , सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, सर्व मंडल अधिकारी ,विस्ताराधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कोकरूड पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .