जात कागदावरून पुसा.ब-याच समस्या सुटतील .____ शेती मित्रअशोकराव थोरात

 जात कागदावरून पुसा  ब-याच समस्या सुटतील.
          ___ शेती मित्रअशोकराव थोरात 

          





कराड - प्रतिनिधि,
महाराष्ट्र सरकारने अलिकडेच वाडया वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय चांगला आहे. पण हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे आणि या निर्णयाने वाडया वस्तीचे नाव बदलले जाईल पण कागदावर म्हणजेच शाळेपासून ते सवलती घेण्यापर्यंत सर्व जातींच्या पुढा-यांनी व छोटया मोठया पक्षांच्या पुढा-यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जात सर्व कागदावर लिहून अधिक घटट केली आहे त्याचे काय? खरे पाहता बुधवत  स्वातंत्र्यानंतर लगेचच जात कागदावरून नष्ट करून आर्थिक निकाषावर सवलती देण्याचे कायदे केले असते व त्या कायदयाची कठोर अंमलबजावणी केली असती तर प्रत्येक धर्मातर्गत जात नष्ट झाली असती. शेजारच्या माणसाला माझेजवळ अमूक धर्माचा माणूस राहतो पण तो कोणत्या जातीचा आहे हे ६० वर्षानंतर कळालेच नसते. जातीवाचक वाडया-वस्त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आपोआप निकालात निघाले असते व सर्व जातीतील गरीब-गरजूंना शिक्षण, नोकरीमध्ये न्याय मिळाला असता. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याची गरजच भासली नसती. धर्म अबाधित ठेवून जातीभेद नष्ट करण्यासाठी व जातीअंताची लढाई लढून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे अनेक उपाय आहेत. त्यापैकी शासकीय-निम शासकीय कागदपत्रांवरून जातीचा उल्लेख करण्यास बंदी घालणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
       मा. शरद पवार यांनी वाठी-वस्तीचे नावे बदलण्याची सूचना केली याऐवजी कागदावरून जात संपवण्याची सूचना का केली नाही. जातनिहाय राजकीय आरक्षण, आर्थिक आरक्षण, नोकरीसाठी आरक्षण के प्रकार बंद करणे आवश्यक आहे. आज प्रत्येक जातीचा पुढारी जात निहाय आमदार खासदारकीची मागणी करतो. राजकारणामध्ये तर जातनिहाय लोकप्रतिनिधी निवडण्याने त्या-त्या जातीचे व एकूण समाजाचे काय कल्याण झाले याचा एकदा आढावा घेणे गरजेचे आहे. जातीच्या जीवावर व  पाठींब्यावर जे जे ग्रामपंचायत पासून खासदार पर्यंत लोकप्रतिनिधी झाले त्यांनी स्वत:च्या व आपल्या बगलबच्यांच्या कल्याणापलिकडे समग्र जातीचा व संसदीय लोकशाहीच्या कल्याणाचा विचार कधी केला असे दिसत नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती होईल तसेच आर्थिक प्रगती होईल त्याप्रमाणात छोटया-मोठ्या शाहारामध्ये व शाळा कॉलेजेसमध्ये समाजात व शाळेत वावरताना जातीचा भेद कमी जाणवतो. पण त्याचेवळी कागदावरील जात व जातनिहाय आरक्षण पूढे येते तेव्हा हा झालेला चांगला परिणाम पूसून टाकला जातो. त्यामुळे या देशातला सर्व समाज जाती अंतर्गत सतत दुभंगालोला राहून वेळोवेळी जीवघेणा संघर्ष पाहावयास मिळतो. जसे की मध्यपूर्वमधील अनेक देशामधील एकाच धर्मातील २१ पंथामधील निरपराधी शेकडो लोक दररोज बळी पडत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या देशातील मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पुढारी व शासकीय अधिका-यांनी विचार करून ख-या अर्थाने जातीअंत घडवून आणला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .