आम आदमी विमा योजना सविस्तर माहिती.

 आम आदमी विमा योजना  सविस्तर माहिती.




ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील.

योजनेचे नाव  -  आम आदमी विमा योजना.

योजनेचा प्रकार - केंद्र पुरस्कृत योजना.

योजनेचा उददेश-  विमा संरक्षण व शिष्यवृत्ती.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव- सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.


योजनेच्या प्रमुख अटी

ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.



दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते.

नैसर्गिक मृत्यू - रु. 30,000/-

अपघाती मृत्यू - रु.75, 000/-

अपघातामुळे कायमचे अपंग - रु.75, 000/-

अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास - रु.75, 000/-

अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास - रु.37, 500/-

या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.


अर्ज करण्याची पध्दत

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.



योजनेची वर्गवारी - 

विमा संरक्षण व शिष्यवृत्ती



संपर्क कार्यालयाचे नाव- 


जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .