मुख्य महामार्गावरील खुजगांव हद्दीत असलेल्या धोकादायक वळणावर दुहेरी मार्ग करण्याची मागणी.

 मुख्य महामार्गावरील खुजगांव हद्दीत असलेल्या धोकादायक वळणावर दुहेरी मार्ग करण्याची मागणी.

शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार )

कराड  रत्नागिरी महामार्गावरील  खिरवडे फाट्या जवळील खुजगांव ता.शिराळा हद्दीत असलेल्या मेणी जलसेतुच्या पिलर जवळ धोकादायक वळण रस्ता  हा  दुहेरी मार्ग करुन वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी महाडीक युवाशक्ति  संघटनेच्या वतीने निवेदना द्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिराळा तहसिलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले असुन . या निवेदनात २२डिसेबंर रोजी रस्ता रोको करणार असल्याचे म्हटले आहे.

पाचवड फाटा ते कोकरुड ता.शिराळा जाणार्‍या राज्य मार्ग १४४  या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने अत्यंत धोकादायक अशी वळणे व चड उतार 

 बांधकाम विभागाने काढले आहेत. त्यानुसार या रस्त्याचे खिरवडे फाटा ते खुजगांव  या मार्गावरील काम पूर्णावस्थेत येत आहे. सदर रस्त्यावरील मेणी जल सेतु व वारणा जलसेतु जवळ साखळी क्रमांक ३६ / ४७० आणि ३८ /०५६ येथील वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले परंतु अत्यंत धोकादायक असे वळण अद्यापही कायम असून,  रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेने हा रस्ता अरूंद पडत आहे.

अनेकदा छोटे-मोठे अपघात देखील घडले आहेत. हे वळण काढण्यासाठी  बांधकाम विभागास वेळो वेळी ग्रामस्थांनी निवेदने ही दिली होती. सदर वळण काढून रस्ता दुहेरी करण्यासाठीची जागा पाटबंधारे विभागाची असल्याने या जागेत कोणतीही अडचण नसुन देखील रुंदीकरणावेळी  कोणतेही कार्यवाही झालेली नाही. बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सदरचे धोकादायक वळण रस्ता कायम ठेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. मागील पाच दहा वर्षात  या धोकादायक वळणावर तब्बल २५ ते ३० अपघात झाले असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे महामार्गावरील असलेले धोकादायक वळण  मृत्यूचा सापळा बनला आहे. सदरचे धोकादायक वळण काढून रस्ता  दुहेरी मार्ग करुन सुरळीत करण्याची मागणी महाडीक युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या सर्दभात वेळो वेळी निवेदन देवुन ही कसली ही  कार्यवाही न करता रुंदी करण केल्याने २२डिसेबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .