आदर्श ज्युनियर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

 आदर्श ज्युनियर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे संविधानाचे शिल्पकार  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


  कराड -  प्रतिनिधी
 मलकापूर येथील आदर्श ज्युनियर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे संविधानाचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन श्री आर.आर.देसाई व सौ आर.ए.पवार यांच्या शुभहस्ते करून त्यांना अभिवाद करण्यात आले.
      त्याप्रसंगी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य एस. वाय. गाडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील कोट्यावधी शोषित व दलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, संविधानाचे शिल्पकार होते.त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ज्ञान क्षेत्रातील 64 विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत. तसेच सामाजिक व आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते.
     त्याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक  श्री  एस.बी.शिर्के  पर्यवेक्षक  श्री ए.एन. शिर्के सर्व शिक्षक, आदर्श ज्युनिअरच्या सौ एस.डी पाटील त्यांचे  सर्व सहकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .