पक्षिरोधक जाळी /गारपिटरोधक जाळी,भाजीपाला व फळपीकांचे संरक्षणाकरता.

 पक्षिरोधक जाळी /गारपिटरोधक जाळी,भाजीपाला व फळपीकांचे  संरक्षणाकरता. 

ब्यूरो रीपोर्ट - प्रदीप पाटील.

पक्षिरोधक जाळीचा उपयोग भाजीपाला व फळपीकांचे पक्षां पासून संरक्षण करण्याकरिता होतो. तसेच गारपीट रोधक जाळी मुळे भाजीपाला व फळपीकांचे गार पीटी पासून संरक्षण करता येते ,भाजीपाला व फळपिकांचे नुकसान टाळता येते यासाठी शासनाने अनुदान तत्त्वावर पक्षी विरोधक जाळी देण्यात येते.  

अर्थसहाय्य- 

जाळी व इतर घटकांचा खर्च रु.35/-प्रती चौ.मी.इतका अपेक्षित धरलेला असुन या खर्चाच्या 50 टक्के अनुदान शेतकरी यांना मिळते.

प्रती लाभार्थी 5000 चौ.मी.पर्यंत लाभ देय आहे.


लाभ कोण घेऊ शकतात- 

वैयक्तीक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, बचत गट, सहकारी संस्था.

इतर योजनेतून यापूर्वी अनुदान घेतलेले नसावे.


पक्षिरोधक जाळीचे प्रकार-


1) इकोनोमी अँटी बर्ड नेट(मेश साईज-15x 15मिमी).

2) हेवी ड्युटी अँटी बर्ड नेट(मेश साईज-12x 12मिमी).


अर्ज कुठे करावा- https://hornet.gov.in  या वेब साईट वर ऑनलाईन अर्ज करावा. व ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन 7/12 व 8अ सह तालुका कृषी अधिकारी कार्यलयात सादर करावे.


अधिक माहिती साठी-     https://drive.google.com/file/d/1TwND_9wtUrJtdt1B4j8SojkK59DtRU1B/view?usp=drivesdk







source- https://hornet.gov.in

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .