शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गुर्‍हाळ घरांचा चालु वर्षीचा हंगाम अडचणीचा.

 शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गुर्‍हाळ घरांचा चालु वर्षीचा हंगाम  अडचणीचा.

 कोरोना आणि लाॅकडाऊन झाल्याने मार्केट ची अवस्था बिकट त्यातच दर नसल्याने गुळाच्या दरात घसरण."


  शिराळा  -  प्रतिनिधी (आनंदा सुतार ,)

गतवर्षी बळीराजावर आलेले आसमानी संकट तसेच  महापुरामुळे  आणि यंदा कोरोना महामारीने घातलेले थैमान यामुळे शिराळा  व शाहुवाडी तालुक्यातील गुऱ्हाळ घरांना मोठा फटका बसला आहे. त्यातून ही गूळ उत्पादकांनी कसे बसे आपली गुऱ्हाळघरे सुरू केली खरं मात्र महामारीच्या आपत्तीमुळे दरात घट झाली आहे.  त्यामुळे दर ही अपेक्षित असे  मिळेनात  आता हंगाम सुरु झाला असून  अखेर पर्यत गुराळ घरे चालतील का नाही याची चिंता लागुन राहीली आहे अशी माहिती गुराळ घर मालकांनी दिली .त्यातच  कामगारांची कमतरता वाढलेला उत्पादन खर्च अशा अनेक समस्या असतानाही शिराळा तालुक्यात दरवर्षी गुऱ्हाळ घरे सुरू होतात मात्र या समस्यांमुळे दरवर्षी गुऱ्हाळ घरांची संख्या कमी होऊ लागली गेल्या वर्षीच्या हंगामात सुमारे दहा ते बारा गुऱ्हाळघरेच सुरू झाली होती यंदा तेवढी गुराळघरे सुरू होतील असा अंदाज होता मात्र  यंदाच्या हंगामात पाच ते सहा गुराळ घरेच सुरू झाली   यंदा साडेतीन महिन्यांतच हंगाम आटोपणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी गुराळघरे ऑक्‍टोबर महिन्यात सुरू होतात सुमारे पाच ते साडेपाच महीने हंगाम सुरु राहतो मात्र लाॅकडाऊन आणि कोरोना महामारीमुळे यंदाचा हंगाम एक महिना उशिरा म्हणजे नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आहे परिणामी यंदाचा हंगाम साडेतीन महिन्यातचआटोपणार आहे. सरकार साखर कारखान्यांना मदत करते मग गुर्‍हाळ घरांना का  मदत करत नाहीत. गुळाचे दर निश्चित केले असते तर गरीब शेतकरी व गुर्‍हाळ मालक दोन्ही सुखी झाले असते सरकारने गुर्‍हाळांना अनुदान देऊन गूळ खरेदी करून सहकार्य करावे अन्यथा ही परिस्थिती अशीच राहिली तर  गुर्‍हाळ व्यवसाय हे कायमचे बंद होतील अशी खंत शेतकरी व गुर्‍हाळ मालक करत आहेत.


सरासरी दोन टन ऊस गाळप 

केल्यानंतर दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलो गुळ  मिळतो.दर्जेदार ऊस नसल्यास दोन टन ऊसाचे गाळप केल्यानंतर २२० ते २४० किलो गुळ  उत्पादीत होतो, ४० ते ५० किलोने  गुळ उत्पादनात घट होते. त्यात अपेक्षीत दरही  मिळत नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम लवकर संपेल.

कुलदीप देशमुख गुर्‍हाळ घर मालक कोकरुड.



 यंदाच्या गूळ हंगामावर कोरोना महामारीचे संकट आले त्यातुनही गुळ उत्पादन सुरू केले गुर्‍हाळासाठी कामगार मिळत नसल्याने या वर्षी कारखान्याच्या  दरा प्रमाणे ऊस विकत घेवुन व्यवसाय करावा लागत आहे जर आम्ही गुळाला कारखान्याचा दर देऊन शेतकर्‍यांचा ऊस घेत असेल तर सरकारने गुर्‍हाळ घरांना अनुदान देणे गरजेंचे आहे.  


हंबीरराव जाधव गुर्‍हाळघर मालक

  माळेवाडी .






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .