बेरोजगार उमेदवारांसाठी 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.

 बेरोजगार उमेदवारांसाठी 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.



सातारा दि.3 (जिमाका): कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.  मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोन द्वारे घेण्यात येणार आहेत.

काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत तळ मजला एस.टी स्टॅन्ड जवळ, सातारा येथे किंवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .