संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा आंदोलनाचा इशारा.
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा आंदोलनाचा इशारा.
शिराळा - प्रतिनिधी ,
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चा आंदोलनाचा इशारा. सोनवडे, ता. शिराळा जि. सांगली याठिकाणी हरिजन वस्ती मध्ये साकव बांधण्यासाठी विशेष घटक योजनेतून 24 लाखाचा निधी समाज कल्याण मार्फत मंजूर झाला असून तो निधी काही प्रस्थापितांनी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी भलत्याच ठिकाणी वळवण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली असून स्थानिक हरिजन वस्तीतील काही लोकांच्या पुढाकाराने संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या निदर्शनास आणून दिले. दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष घटक योजनेचे काम नियोजित ठिकाणी योग्य वापर न केल्यास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदिप कांबळे यांच्या वतीने तहसीलदार शिराळा यांना देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी प्रकाश लोखंडे, विजय कांबळे, यशवंत कांबळे , ज्ञानदेव कांबळे , पोपट बनसोडे, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.
.

Comments
Post a Comment