राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सातारा जिल्हा यांचे वतीने निवेदन .
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सातारा जिल्हा यांचे वतीने निवेदन .
" विविध मागण्यांसाठी कराड येथे तहसीलदारांना दिले निवेदन"
कराड - प्रतिनिधी,
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सातारा जिल्हा यांचे वतीने कराड येथे तहसीलदारांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले .
या विविध मागण्यांमध्ये दिव्यांगांसाठी संजय गांधी पेन्शन योजनेमध्ये होणारी फसवणूक , दिव्यांगांचे कोरोना काळातील लाइट बिल माफ होणे बाबत,दिव्यांगांसाठी अंतोदय कार्ड त्वरित वाटप होण्याबाबत ,दिव्यांगांसाठी तहसीलदार कार्यालयात तक्रार निवारण केंद्र उघडण्याबाबत ,दिव्यांग हक्क नियमन कायदा २०१६ ची अंमलबजावणी होण्याबाबत , दिव्यांग ५ % टक्के निधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वितरित होत नाही त्याबद्दल सखोल चौकशी करून याची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत. दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या
कर्ज पुरवठय़ामधील जाचक अटी रद्द करण्याबाबत.
या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात जाहीर करण्यात आले.या वेळी दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment