अथणी रयत साखर कारखान्याच्या प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील एकरकमी एफ .आर.पी. चा तिढा सोडवला. " बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार "
अथणी रयत साखर कारखान्याच्या प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील एकरकमी एफ .आर.पी. चा तिढा सोडवला.
" बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार "
कराड - प्रतिनिधि,
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने अथणी रयत साखर कारखान्याच्या प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील एक रकमी एफ आर पी चा तिढा सोडवून एक रकमी एफ आर पी जाहीर करून 2900 रुपये दर जाहीर केला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
कारखाने सुरू होऊन एक ते दीड महिना झाला परंतू अद्यापही एकाही साखर कारखान्याने एक रकमी एफ आर पी देतो असे जाहीर केलेली नाही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एक रकमी एफ आर पी चा तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली व यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता दरम्यान काल परवा अथणी रयत शुगरच्या प्रशासनाने एक रकमी एफ आर पी अधिक पस्तीस रूपये जास्तीचे देऊन 2900 रुपये दर एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे जाहीर केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या द्रुष्टीने हा चांगला निर्णय अथणी प्रशासनाने घेऊन सातारा जिल्ह्यातील एक रकमी एफ आर पी चा तिढा सोडवला त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केला वास्तविक या कारखान्याचे विशेष आभार यासाठी कि कोणतंही या कारखान्यातून उपपदार्थांची निर्मिती होत नाही उदा डिस्लरी इथेनाल ,विद्युत निर्मिती यासारखे इतर उत्पादने होत नसताना अथणी प्रशासनाने अधिकचे एफ आर पी पेक्षा जास्त पस्तीस रुपये जाहीर करुन शेतकऱ्यांहा निर्णय फायद्याचा आहे परंतु इतर साखर कारखाना प्रशासनाने अगदी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ग्रुहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या कारखान्यांनी ही एक रकमी एफ आर पी चा तिढा सोडविला नाही लवकरात लवकर सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी एक रकमी एफ आणि अधिकचे किती देणार हे जाहीर करावे अन्यथा शेतकऱ्यांच्याकडून मोठ्या आंदोलनाची तयारी चालू आहे यावेळी अथणी शुगरचे एम डि रविन्द्र देशमुख साहेब , विनोद पाटील शेती अधिकारी , शैलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला , घराळ बापू , सुनील कोळी , चंद्रकांत यादव ,मनोज जंबुरे व शेतकरी उपस्थित होते.

Comments
Post a Comment