अखेर ग्रामस्थांनी प्रशासनास रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले.

 अखेर ग्रामस्थांनी प्रशासनास रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले.

"दुहेरी मार्ग जो पर्यत करणार नाही तो पर्यत काम बंद करणेचे अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन."

 शिराळा - प्रतिनिधी  (आनंदा सुतार)

खुजगांव ता शिराळा येथील दोन्ही जलसेतु जवळ समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने आपघात होऊन  कित्येक वाहन चालकाचे प्राण गेले  तर काहीनां कायमचेअपंगत्व आले . या ठिकाणी दुहेरी मार्ग करावा यासाठी खुजगांव ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आकरा वाजता केलेले. यावेळी रस्ता रोको आंदोलन अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यकअभियंता रोकडे यांनी दुहेरी मार्ग काढणेत येईल तो पर्यंत या ठिकाणचे रस्त्याचे काम थांबणेत येईल असे  लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेणेत आले .शिराळचे  नायब तहसिलदार आर. बी. शिद यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी कोकरूड पोलीस स्टेशनचे स. पो. नि. ज्ञानदेव वाघ यांनी कोणता ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

पाचवड फाटा ते कोकरुड या मार्गाचे राज्य महामार्ग १४४ मध्ये  रूपांतर होत असून रस्ता रूंदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे पंरतु खिरवडे फाटा येथील खुजगांव हद्दीत  मेणी जलसेतुच्या पिलर जवळ समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे या ठिकाणी  आपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकांचे संसार उदवस्त  झाले असुन   आपघातास कारणीभुत ठरणार्‍या या ठिकाणी दुहेरी मार्ग करावा यासाठी अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशाची तसेच वाहन चालकांची मागणी होती परंतु रस्ता रूंदीकरणावेळी दुहेरी मार्ग काढला जाईल असे आश्वाशन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुर्वी  दिले होते   त्याचा मात्र सध्य परस्थितीला  प्रशासनास विसर या आधिकार्‍यांना पडल्यामुळे खुजगांव येथील ग्रामस्थांनी   अंदोलनाचा पवित्रा घेत मंगळवारी सकाळी अकरा वाजता रस्ता रोको अंदोलन सुरू केले निवेदन स्विकारण्यासाठी  बांधकाम विभागाचे एकच आधिकारी आले असल्यामुळे यांना काही गांभीर्य नाही असा अंदोलकानी आरोप करत आक्रमक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी धास्तावले त्यांनी वरिष्ठ आधिकार्‍यांना फोन करून घटनेची  माहिती दिली    यात तोडगा काढणेत येऊन  जल सेतुच्या साखळी क्रमांक ३६ / ४७० आणि ३८ /०५६ दोन्ही पिलर जवळील दुहेरी मार्ग तयार होई पर्यंत येथील सुरु असणारे  काम बंद करणेचे लेखी आश्वाशन  देणेत आल्यानंतर आदोलंन मागे घेणेचा निर्णय घेणेत आला. यावेळी शामराव सावंत,  बाळू सावंत,  माजी सरपंच नथुराम सावंत,बाजीराव शेडगे,खिरवडे सरपंच प्रमोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दिनकर शेडगे ,नाठवडेचे सरपंच बाजीराव मोहिते,  रंगराव शेडगे, प्रकाश सावंत धनाजी सावंत,  पै.राहुल पाटील, सर्जेराव सावंत,  मोहन सावंत ,अल्लाबक्ष मुजावर,  यशवंत सावंत ,अनिल घोडे, शेडगेवाडी बाजार पेठेतील व्यापारी  आदिसह पमुजावररिसरातील नागरिक प्रवाशी व विवीध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 




 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .