भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा कराड दक्षिण भाजपच्यावतीने करण्यात आला निषेध.

 भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा कराड दक्षिण भाजपच्यावतीने करण्यात आला निषेध.


प्रतिनिधी / मलकापुर


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या गाडीवर तृनमुल काॅंग्रेसच्या गुंडांनी पस्चिम बंगाल येथे केलेल्या हल्ल्याचा निषेध भाजपा कराड दक्षिण तालुक्याच्यावतीने मलकापुर येथील भाजपा पक्ष कार्यालयासमोर आज करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील (काका) यांच्या नेतृत्वाखाली. आंदोलन करण्यात आले. यावेळी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष राहूल चव्हाण, मलकापुर युवा मोर्चा शहर अध्यक्ष संतोष हिंगसे, कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, नगरसेवक भास्कर सोळवंडे, यांची उपस्थिती होती. 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या गाडीवर तृनमुल काॅंग्रेसच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकीचा निषेध करुन ममता बॅनर्जी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी १० च्या सुमारास भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मलकापुर येथील भाजपा पक्ष कार्यालयासमोर जमुन पस्चिम बंगाल सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आण्णासो काशिद, सुर्यकांत खिलारे, आनंदा ताटे, अभिषेक कारंडे, विक्रम राऊत, यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .