वडगांव हवेली येथील सिद्धनाथ-जोगेश्वरी यात्रा रद्द.
वडगांव हवेली येथील सिद्धनाथ-जोगेश्वरी यात्रा रद्द.
कार्वे - प्रतिनिधी,
वडगांव हवेली (ता. कराड) येथील कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवाची येत्या मंगळवारी दि.१५ व बुधवारी १६ रोजी यात्रा होत आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतीच ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये यात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
तेथील कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथयात्रा देवदीपावली दिवशी सुरु होते. परंपरेनुसार येत्या व मंगळवारी व बुधवारी आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साजरी करण्याबाबत चर्चा करणेसाठी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद जयवंतराव जगताप, पोलीस पाटील दिपक जगताप, सरपंच सुनीता जगताप उपसरपंच राजेंद्र थोरात ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जे. जे.जगताप यांचेसह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत पोलीस पाटील दिपक जगताप म्हणाले की, आजही कोरोनाचा संसर्ग पूर्णतः थांबलेला नाही. अजुनही सर्वत्र भितीचे वातावरण आहे आपण स्वतःहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. यात्रेमध्ये गर्दी झाल्यास कोरोना संसर्गास वाव मिळेल. त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण टाळण्यासाठी ग्रामस्थांनी यात्रेत पै-पाहुण्यांना निमंत्रण देण्याचे टाळा, असे त्यांनी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत यात्रा रद्द करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. त्यानंतर मंगळवारी देवदीपावली दिवशी सकाळी पारंपारिक पद्धतीने श्रीचा धार्मिक विधी झाल्यानंतर ग्रामपंचाती समोरील पटांगणात रथामध्ये विधीवत श्रीच्या मूर्ती दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. ग्रामस्थांनी सामाजिक अंतर पाळून श्रीचे दर्शन घ्यावे. त्याव्यतिरिक्त कोणतेही विधी व कार्यक्रम होणार नाहीत. असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेणेत आला.

Comments
Post a Comment