तरुणानी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याची संधी.
तरुणानी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याची संधी..
उंडाळे - प्रतिनिधि,
सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण जोर धरु लागल्याने आपल्या गावाचा कारभार सुरळीत चालवून गाव पातळीवरच गावाचा विकास करुन घेणे हा ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश असतो.निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये "जय ,पराजय ठरलेला असतो. परंतू ग्रामपंचायत निवडणूक समजुन घेणे गरजेचे बनत चालले आहे, कारण एक निवडणूक आपल्या गावाचे रंग , रुप बदलु शकते.प्रत्येक ग्रामपंचायत ही त्या त्या गावची संसद असते, आणि म्हणूनच संसदेच्या माध्यमातून आपल्या गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखुन चौफेर प्रगती साधता येवु शकते.गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्वोच्च संसदेच्या माध्यमातून गावचा चौफेर विकास साधण्यासाठी सध्याच्या तरुण पिढीने पुढाकार घेवुन ग्रामपंचायत मार्फत निवडणूक लढवण्याची सक्त गरज असुन गावातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी या बरोबर गावच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण कौशल्य विकास, ग्राम विकासावर भर देवुन गावचे काम व नावलौकिक कमवण्याचे संधी म्हणजेच ग्रामपंचायत निवडणूक होय..
वर्षोनुवर्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेच गट, तोच नेता गावचा कारभार चालवत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असुन यामुळे लोकाचा मताधिकार व ग्रामपंचायतीचे महत्व आपोआप कमी झाले आहे. 'तेच तेच चेहरे पुन्हा पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जात असुन गावच्या सर्वागीण विकास कुठेचं दिसुन येत नाही. तर दर पाच वर्षानी निवडणूक घेवुन फायदा काय ? पंचवार्षिक निवडणुकीचा उद्दिष्ट हे आहे की, निवडून दिलेला काम करत नसेल तर, त्यांच्या जागी दुसऱ्याला संधी निर्माण करुन देणे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत युवकांनी स्वःयमपुर्तीने पुढाकार घेवुन वर्षावर्षे भष्टाचाराने भरभटलेल्या छेद देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment