Posts

Showing posts from December, 2020

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी.

Image
  पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी.              सातारा दि.31 (जिमाका):  शासनाच्या आदेशानुसार  राज्यातील कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून सदर लॉकडाऊन कालावधी 31 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्हयात 1 जानेवारी 2021  रोजीचे 00.00 वाजले पासून ते 31 जानेवारी 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.   जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.               सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट तसेच इयत्ता 9 ते 12 चे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह वगळून) या बंद राहतील. तथापी ...

जिल्ह्यातील 58 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित.

Image
  जिल्ह्यातील 58  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित.   सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातीलसातारा 3,  बुधवार पेठ 1, राधिका रोड 2, कोडोली 1, चिमणपूरा पेठ 4, शाहुनगर 2, लिंब 1, सत्यशीलानगर 1, विलासपूर 2. कराड तालुक्यातील कराड 1, कालेगाव 1,  शेणोली 1, जुळेवाडी 1. फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, मिरेवाडी 1, जाधववाडी 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, निमसोड.           माण  तालुक्यातील पळशी 4, म्हसवड 5, गोंदवले बु 3, विरकरवाडी 3, बांगरवाडी 1, ढाकणी 1, दिवड 1, मानेवाडी 1.            कोरेगाव तालुक्यातील एकसळे शिरंभे 1, रहिमतपूर 5.            जावली तालुक्यातील  कुडाळ 1. वाई तालुक्यातील कुसगाव 1, खानापूर 1. खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1. * पाटण तालुक्यातील* निवडे 1. ...

भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

Image
भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी. कराड - प्रतिनिधि,   जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें..तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा. कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी येथील वयोवृद्ध पंढरीनाथ भिवा बंडगर हे कळकट- मळकट फाटलेल रेशनकार्ड हातात घेऊन ते गेल्या दिड वर्षापासून गावातील रेशन दुकानदार बबन हंडाळ हा धान्य देत नाही म्हणून त्याची ओरड घेऊन कर्जत तहसीलदार कार्यालयात आले होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे हे सध्या ग्रामपंचायती निवडणूक असल्याने चापडगांव येथील मित्रांचे अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.  त्यावेळी वयोवृद्ध पंढरीनाथ बंडगर यांनी हाक मारून म्हणाले साहेब मला मामलेदारांना भेटायचं आहे.  श्री.कांबळे यांनी त्यांना विचारले काय काम आहे मामलेदाराकडे तेव्हा त्यांनी कुटूंबाची सर्व सविस्तर कर्म कहाणी सांगितली. कांबळे यांनी लगेचच तहसीलदार नानासाहेब आगळे यांना माहिती देताच प्रशासन खडबडून जागे झाले.तहसीलदार साहेबांनी तात्काळ अन्न धान्य पुरवठा विभागाच्या श्री.गिते यांना बोलावून घेतले सदर रेशनकार्ड धारकास धान्य मिळत आहे असे ग...

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून "कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००६" साठी जनजागृती मोहीम.

Image
  रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून "कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००६" साठी जनजागृती मोहीम. कराड - प्रतिनिधि, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून "कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००६" साठी जनजागृती करण्याचा आम्ही आमच्या परीने छोटा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात एक  निवेदन देण्यासाठी आणि या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी आम्ही तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची भेट घेतली. प्रतिष्ठान याबद्दल नक्की काय करतेय हे सांगताना महिलेवर कोणत्याही पद्धतीचा दबाव, शारीरिक त्रास, मानसिक त्रास होत असल्यास त्यांचे समोपदेशन (Counselling) कुटुंबातील दोन्ही बाजू समजून घेऊन समजूतदारपणे मिटवून मार्गी लावणे, कायद्याच्या काही बाजू समजून देण्यासाठी महिलांना मदत, त्यांच्या रोजगारासाठी मदत अशा सर्व गोष्टी करत आहोत हे जाणून त्यांना आनंद झाला. आणि त्यांनी पटकन मला दि. ९ मार्च २०२० रोजी त्यांच्याच  मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय सातारा आवारात स्थानिक गुन्हे शाखा सातारा अंतर्गत "भरोसा सेवा संकुल" उभारण्या...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना.

Image
      राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. ब्यूरो रीपोर्ट - प्रदीप पाटील.   योजना सविस्तर माहिती योजनेचे नाव राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केंद्र सरकारमार्फत अर्थसाह्य दिले जाते  . योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना. योजनेचा उददेश-  आर्थिक सहाय्य. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. योजनेच्या प्रमुख अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो योजनेची वर्गवारी आर्थिक सहाय्य संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

कोरोना पार्श्वभूमीवर नाताळ साध्यापध्दतीने साजरा करावा: जिल्हाधिकारी जिल्ह्यात कलम 144 लागू.

Image
  कोरोना पार्श्वभूमीवर नाताळ साध्यापध्दतीने साजरा करावा: जिल्हाधिकारी जिल्ह्यात  कलम 144 लागू. सातारा, दि.24 (जिमाका): कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयात नाताळ सण हा उत्सव साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 जारी केला असून  25 डिसेंबर रोजी रोजीचे रात्री बारा वाजलेपासून  नाताळ सण उत्सव पुर्ण होईपर्यंत पुढील प्रमाणे आदेश जारी  केले आहेत.   खिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पध्दतीने साजरा करावा.  नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी.  चर्चमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझारचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.   नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येणूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्य...

अखेर ग्रामस्थांनी प्रशासनास रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले.

Image
  अखेर ग्रामस्थांनी प्रशासनास रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले. "दुहेरी मार्ग जो पर्यत करणार नाही तो पर्यत काम बंद करणेचे अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन."  शिराळा - प्रतिनिधी  ( आनंदा सुतार) खुजगांव ता शिराळा येथील दोन्ही जलसेतु जवळ समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने आपघात होऊन  कित्येक वाहन चालकाचे प्राण गेले  तर काहीनां कायमचेअपंगत्व आले . या ठिकाणी दुहेरी मार्ग करावा यासाठी खुजगांव ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आकरा वाजता केलेले. यावेळी रस्ता रोको आंदोलन अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यकअभियंता रोकडे यांनी दुहेरी मार्ग काढणेत येईल तो पर्यंत या ठिकाणचे रस्त्याचे काम थांबणेत येईल असे  लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेणेत आले .शिराळचे  नायब तहसिलदार आर. बी. शिद यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी कोकरूड पोलीस स्टेशनचे स. पो. नि. ज्ञानदेव वाघ यांनी कोणता ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.  पाचवड फाटा ते कोकरुड या मार्गाचे राज्य महामार्ग १४४ मध्ये  रूपांतर होत असून रस्ता रूंदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे पंरत...

जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.

Image
  जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.     सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1,  *कराड तालुक्यातील* कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1,             *पाटण तालुक्यातील* पाटण 1,           *फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1,            *खटाव तालुक्यातील* निमसोड 2, खातगुण 1,            *माण  तालुक्यातील* पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,               *कोरे...

तरुणानी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याची संधी.

Image
  तरुणानी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याची संधी.. उंडाळे - प्रतिनिधि, सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण जोर धरु लागल्याने आपल्या गावाचा कारभार सुरळीत चालवून गाव पातळीवरच गावाचा विकास करुन घेणे हा ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश असतो.निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये "जय ,पराजय ठरलेला असतो. परंतू ग्रामपंचायत निवडणूक समजुन घेणे गरजेचे बनत चालले आहे, कारण एक निवडणूक आपल्या गावाचे रंग , रुप बदलु शकते.प्रत्येक ग्रामपंचायत ही त्या त्या गावची संसद असते, आणि म्हणूनच संसदेच्या माध्यमातून आपल्या गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखुन चौफेर प्रगती साधता येवु शकते.गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्वोच्च संसदेच्या माध्यमातून गावचा चौफेर विकास साधण्यासाठी सध्याच्या तरुण पिढीने पुढाकार घेवुन ग्रामपंचायत मार्फत निवडणूक लढवण्याची सक्त गरज असुन गावातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी या बरोबर गावच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण कौशल्य विकास, ग्राम विकासावर भर देवुन गावचे काम व नावलौकिक कमवण्याचे संधी म्हणजेच ग्रामपंचायत निवडणूक होय..  वर्षोनुवर्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमात...

कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे घडले माणुसकीचे दर्शन.

Image
  कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांचे घडले माणुसकीचे दर्शन.           मोरगिरी /किशोर गुरव  सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला,त्याच वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.अपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत  मंत्री देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भिलेली होती, तिच्या समवेत एक लहान मुलही होते.  मंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले, आणि तेथिल अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पीटल मध्ये नेण्याच्या सुचना केल्या. मंत्री देसाई यांनी जखमींसाठी पाणी आणण्याच्या सूचना केल्या. त्याच वेळी अपघातग्रस्त एसटीच्या चालकासही शंभूराज देसाई यांनी चांगलेच सुनावले. मंत्री देसाई यांनी या वेळीं दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली. या वेळी त्यांच्यातील माणूसपनाचेही दर्शन घडले, मंत्रीपणाचा डामदौल बाजूला ठेऊन देसाईं यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस...

मुख्य महामार्गावरील खुजगांव हद्दीत असलेल्या धोकादायक वळणावर दुहेरी मार्ग करण्याची मागणी.

Image
  मुख्य महामार्गावरील खुजगांव हद्दीत असलेल्या धोकादायक वळणावर दुहेरी मार्ग करण्याची मागणी. शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार ) कराड  रत्नागिरी महामार्गावरील  खिरवडे फाट्या जवळील खुजगांव ता.शिराळा हद्दीत असलेल्या मेणी जलसेतुच्या पिलर जवळ धोकादायक वळण रस्ता  हा  दुहेरी मार्ग करुन वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी महाडीक युवाशक्ति  संघटनेच्या वतीने निवेदना द्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिराळा तहसिलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले असुन . या निवेदनात २२डिसेबंर रोजी रस्ता रोको करणार असल्याचे म्हटले आहे. पाचवड फाटा ते कोकरुड ता.शिराळा जाणार्‍या राज्य मार्ग १४४  या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने अत्यंत धोकादायक अशी वळणे व चड उतार   बांधकाम विभागाने काढले आहेत. त्यानुसार या रस्त्याचे खिरवडे फाटा ते खुजगांव  या मार्गावरील काम पूर्णावस्थेत येत आहे. सदर रस्त्यावरील मेणी जल सेतु व वारणा जलसेतु जवळ साखळी क्रमांक ३६ / ४७० आणि ३८ /०५६ येथील वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले परंतु अत्...

संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा आंदोलनाचा इशारा.

Image
  संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा आंदोलनाचा इशारा. शिराळा  -  प्रतिनिधी ,     संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चा आंदोलनाचा इशारा. सोनवडे, ता. शिराळा जि. सांगली याठिकाणी हरिजन वस्ती मध्ये साकव बांधण्यासाठी विशेष घटक योजनेतून 24 लाखाचा निधी समाज कल्याण मार्फत मंजूर झाला असून तो निधी काही प्रस्थापितांनी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी भलत्याच ठिकाणी वळवण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली असून स्थानिक हरिजन वस्तीतील काही लोकांच्या पुढाकाराने संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या निदर्शनास आणून दिले. दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष घटक योजनेचे काम नियोजित ठिकाणी योग्य वापर न केल्यास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदिप कांबळे यांच्या वतीने तहसीलदार शिराळा यांना देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी प्रकाश लोखंडे, विजय कांबळे, यशवंत कांबळे , ज्ञानदेव कांबळे , पोपट बनसोडे, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. .

जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.

Image
  जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.        सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल  शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये    *सातारा तालुक्यातील, सातारा 3,आरफळ 3,प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3,करंजे पेठ 1,भोसलेवाडी 1, वेणेगाव 1,  देगांव 1, कडेपूर 1,कृष्णानगर 1,शाहुनगर 1,महागाव 4 सदरबाजार 1, नागठोण 2,नेले 1, लिंब 1, *कराड तालुक्यातील* कराड 1,वडगाव हवेली  1,मसूर 1, उब्रंज 1, *पाटण तालुक्यातील* *फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 4,लोणंद 1,मिरेवाडी फलटण 2,फरतडवाडी 1, *खटाव तालुक्यातील* खटाव 3,डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1,करंडेवाडी  1,वडूज 2, *माण  तालुक्यातील* माण 3,धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3,  *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, वाठार 1, *वाई तालुक्यातील* सोनगिरवाडी 2,सह्याद्रीनगर 1, *खंड...

माणसातील तपास्वी- संत गाडगेबाबा.

Image
  माणसातील तपास्वी- संत गाडगेबाबा              ब्यूरो रीपोर्ट  - भिमराव परघरमोल.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांची व्याख्या करताना म्हणतात की, ' महापुरुषाला समाजाच्या गतिमानतेबद्दल कळकळ वाटली पाहिजे आणि त्याने समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकांचे काम केलेच पाहिजे. ' त्यांच्या या व्याख्येनुसार संत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वाकडे तटस्थ भूमिकेतून पाहिले तर ते महापुरुषांच्या व तुकाराम महाराजांच्या विचारातील ' देव ' पदाच्या पलीकडे म्हणजे संतपदाला पोहोचलेले होते. संत त्यांनाच म्हटले जाते जे माणसातील तपस्वी असतात. आज समाजातील अनेक लोक स्वतःला संत ही उपाधी लावून घेताना दिसतात. परंतु माणसातील तपस्वी मात्र गाडगेबाबा नंतर कोणीही होऊ शकले नाही.  तपस्वी म्हणजे काय? तर मानवी मोह पाशातून मुक्त होऊन छडविकारांवर विजय मिळवून स्वतःला परमेश्वराच्या समिप जाण्याची किंवा जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याच्या इच्छेने स्वतःला एकांतवासात झोकून देऊन मानवी समूहासोबत कायमचे नाते न ठेवणे. परंतु गाडगेबाबा निरपेक्ष तपस्वी होते. त्यांनी समाजासोबत कधीच नात...

आम आदमी विमा योजना सविस्तर माहिती.

Image
  आम आदमी विमा योजना  सविस्तर माहिती. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील. योजनेचे नाव  -   आम आदमी विमा योजना . योजनेचा प्रकार -  केंद्र पुरस्कृत योजना. योजनेचा उददेश -   विमा संरक्षण व शिष्यवृत्ती. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव - सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. योजनेच्या प्रमुख अटी ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते. नैसर्गिक मृत्यू - रु. 30,000/- अपघाती मृत्यू - रु.75, 000/- अपघातामुळे कायमचे अपंग - रु.75, 000/- अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास - रु.75, 000/- अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास - रु.37...

गावाचा निधी कोठे, कसा, किती खर्च केला?

Image
  गावाचा निधी कोठे, कसा, किती खर्च केला?  ब्यूरो  रीपोर्ट -   प्रदिप पाटील, एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक  कार्यक्रम जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. 23 ते 30 डिसेंबर असून दि. 25, 26 व 27 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून. नामनिर्देशन छाननी करण्याचा दि. 31 डिसेंबर, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दि. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मतदान दि. 15 जानेवारी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. मोतमोजणी दि.18 जानेवारी 2021 होणार तर 21 जानेवारी ला निकाल होणार आहे," पण एखाद्या गावाचे बजेट कसं ठरतं , प्रत्यक्षात विकासकामासाठी निधी मिळतो का? किती मिळतो? ग्रामपंचायत मिळालेला निधी कसा, व किती ,कोठे खर्च करते? याविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत. गावचं बजेट कसं ठरतं , ?  प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर - नोव्हेंब र मध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलवली जाते, त्या मध्ये गावातील महिला कल्याण, शिक्षण, आरोग्य सह ...

मणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव ग्रामसभेने अखेर फेटाळला.

Image
  मणदूर ग्रामपंचायतीचे  सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव ग्रामसभेने अखेर फेटाळला. " विशेष ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच वसंत पाटील २६१ मतांनी विजयी घोषित ".   शिराळा - प्रतिनिधी ( आनंदा  सुतार) मणदुर ता. शिराळा येथील सरपंच यांचे विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज विशेष ग्रामसभेत २६१ मतांनी फेटाळून लावला. सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे असा ठपका ठेवत ११ पैकी ९ सदस्यांनी सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.त्याला संमती घेण्यासाठी आज वारणावती ता. शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कुल तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्यात आली. २५१० मतदारांपैकी १३१२ मतदारांनी या ग्रामसभेसाठी उपस्थिती दर्शवली. दुपारी एक ते पाच या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. संध्याकाळी पाच नंतर लगेचच मतमोजणी झाली. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने ५११     मते तर अविश्वास ठरावाच्या विरोधात ७७२ मते पडली २९ मते अवैध ठरली २६१ मतांनी हा अविश्वास ठराव नामंजूर झाला .अध्यासी अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी निकालाची घोषणा केली. यावेळी तहसीलदार...

समाज कल्याण विभाग विवीध योजना.

Image
समाज कल्याण विभाग  विवीध योजना. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील. राज्यतील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली. या विभागाद्वारे तळागाळातील गावपातळी पर्यतच्या अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना  शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी समाज कल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे. थोडक्यात, समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास करणे हेच समाज कल्याण विभागाचे उद्दिष्टे आहे. समाज कल्याण विभाग योजना दलित वस्ती सुधार योजना या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोई, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार इ. व्यवस्था करून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक गावास लोकसंखेच्या निकष...

सरकारी शाळा व शिक्षकांप्रती दृष्टीकोन बदलणार की नाही?

Image
  सरकारी शाळा व शिक्षकांप्रती दृष्टीकोन बदलणार की नाही?                   अकोला - भिमराव परघरमोल.           सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी येथील वर्ग १ ते ४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी , ' युनेस्को व वार्की फौंडेशन ' यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ' ग्लोबल टीचर अवार्ड ' या शिक्षण क्षेत्रातील नोबेल सदृश्य सर्वोच्च पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. ही बातमी मीडियामध्ये झळकताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याला कारणही तसंच होतं १४० देशांमधून बारा हजार लोकांनी पुरस्कारासाठी नामांकन दाखल केलं असताना त्या सर्वांना मागे टाकत गुरुजींनी बाजी मारली. फक्त बाजीच मारली नाही, तर पुरस्कार व देणाऱ्या संस्थांचाही सन्मान वाढेल अशी गुरुजींच्या वागणुकीतील विनम्र  उदारता. सात कोटींचा पुरस्कार! एवढी कमाई तथा एवढ्या रुपयांचं स्वप्न पाहणे सुद्धा शिक्षकांसाठी पाप किंवा गुन्हा ठरू शकतो. तरीही डिसले गुरुजींचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं होतं. परंतु पुरस्काराने सन्मानित झालेले गुरु...

ग्रामपंचायत म्हणजे काय ? " स्थानिक स्वराज संस्था." ग्रामसभेची कार्यकारी समिती .

Image
  ग्रामपंचायत म्हणजे काय ? "  स्थानिक स्वराज संस्था."    ग्रामसभेची कार्यकारी समिती  . ब्युरो रीपोर्ट  - प्रदिप पाटील. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुम्बई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.   ग्रामपंचायत कायद्यातील कलमे. महाराष्ट्र  ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी. ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मत...

जिल्ह्यातील 100 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु.

Image
  जिल्ह्यातील 100  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु.   सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, जगतापवाडी 1,  अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर 2, नरवडे 1, लावंगर 1,   कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  . पाटण तालुक्यातील सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,   फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2, खटाव तालुक्यातील निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,    माण  तालुक्यातील गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवड...

कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप एकाच दिवसात 9200 मे. टन ऊसाचे गाळप करून केला नवा उच्चांक.

Image
  कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप  एकाच दिवसात 9200 मे. टन ऊसाचे गाळप करून केला नवा उच्चांक. शिवनगर, ता. 15 : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 डिसेंबर रोजी 9200 मेट्रिक टन इतके सर्वोच्च गाळप करत, कारखान्याच्या इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम सहाव्यांदा केला असून, सोमवारी कारखान्याच्या 61 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने ‘कृष्णा’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी 8000 मेट्रिक टनाहून अधिक क्षमतेने 2 लाख 70 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून, 3 लाख 10 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा 12.11 टक्के असून, सरासरी साखर उतारा 11.21 टक्के इतका आहे.     चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी विविध हंगामात तब्बल 5 वेळा एका दिवसात सर्वोच्च गाळपाचा ...

छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेकडून शैक्षणिक साहीत्य वाटप.

Image
छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचेकडून शैक्षणिक  साहीत्य वाटप. शिराळा - प्रतिनिधि,  छत्रपति फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व दारूबंदी जन आंदोलन शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे यांचा वतीने       अंबाईचा वाडा  या  शाळेत शैक्षणिक   साहित्याच  वाटप  करण्यात  आले. प्रदीप बनसोडे, सुधीर बनगरसर, अमर मंगसुळे, सर्जेराव जाधव,बाबासाहेब लाबोंर, दगडू लाबोंर उपस्थित होते.